‘Tata Sky’ ने लॉन्च केला ‘अनोखा’ अ‍ॅण्ड्राइड सेटअ‍ॅप बॉक्स; चॅनलसह अमेझॉन प्राइम, हॉटस्टार, झी 5 सर्वकाही ‘फ्री’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात प्रमुख डीटीएच सेवा देणारी कंपनी टाटा स्कायने आपली नवी सेवा Tata Sky Binge + भारतात लॉन्च केली आहे. Tata Sky Binge + एक अ‍ॅण्ड्राइड सेटटॉप बॉक्स आहे, यात अ‍ॅण्डाइडचा सपोर्ट असल्याने यूजर्स सेटटॉप बॉक्सच्या माध्यमातून सेटेलाइट चॅनेल आणि ओटीटी अ‍ॅप्स जसे की अमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि नेटफ्लिक्स पाहू शकतात.

Tata Sky Binge + ची किंमत आणि उपलब्धता कंपनीच्या www.tatasky.com या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. यावरुन तुम्ही खरेदी करु शकतात. याची किंमत 5,999 रुपये आहे. ही सेवा सध्या फक्त नव्या ग्राहकांसाठी आहे. याच्या स्पर्धेत असलेल्या एअरटेल एक्सट्रीम बॉक्सची किंमत 3,999 रुपये आहे.

Tata Sky Binge + सह काय काय मिळणार –

यात हॉटस्टार, ZEE5 आणि SunNXT सारखे अ‍ॅप मिळतील. जे प्री इंस्टॉल्ड असतील. नव्या ग्राहकांना टाटास्काय बिंजची सेवा फ्री मध्ये मिळेल, ज्याची किंमत 249 रुपये आहे. परंतु ही फ्री सेवा फक्त 1 महिन्यासाठी फ्री आहे. टाटा स्काय बिंजअंतर्गत Hotstar, झी 5 चे सब्सक्रिप्शन फ्री मिळेल. याबरोबर अमेझॉन प्राइमची मेंबरशिप तीन महिन्यासाठी फ्रि मिळेल.

Tata Sky Binge + च्या स्पेसिफिकेशनमध्ये अ‍ॅण्ड्राइड पाई 9.0 सपोर्ट आहे. कंपनीने आपल्या या सेटटॉप बॉक्समध्ये काही खास माहिती दिली नाही. याबरोबर मिळणारा रिमोट गुगल असिस्टंटला सपोर्ट करेल. यात तुम्ही टीव्ही देखील नियंत्रित करु शकतात. ओटीटी अ‍ॅप्सला पाहण्यासाठी इंटरनेटचा सपोर्ट लागेल.

एका वृत्तानुसार Tata Sky Binge + सेटटॉप बॉक्समध्ये तुम्हाला 5000 पेधा जास्त अ‍ॅप्स, गेम डाऊनलोड करण्याची संधी मिळेल. जे तुम्ही गुगल प्ले स्टोरवरुन डाऊनलोड करु शकतात. या सेटटॉप बॉक्समध्ये 2 जीबी रॅम आणि 8 जीबी स्टोरेज असेल. Tata Sky Binge + ला ग्राहक कंपनीच्या वेबसाइटवरुन बुक करु शकतात.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/