‘Tata Sky’ सेट टॉप बॉक्स झाले ‘स्वस्त’, मिळवा Amazon Prime चे ‘फ्री सबस्क्रिप्शन’ आणि इतर अनेक ‘ऑफर्स’

पोलीसनामा ऑनलाईन : देशभरात ओटीटी कंटेंट व स्मार्ट टीव्हीची मागणी असताना टाटा स्काय (Tata Sky) ने आपल्या सेट टॉप बॉक्स Tata Sky Binge+ ची किंमत 1000 रुपयांनी कमी केली आहे. तसेच Tata Sky Binge+ सेट टॉप बॉक्सच्या खरेदीवर बऱ्याच ऑफर देण्यात येत आहेत. हा एक अँड्रॉइड सेट टॉप बॉक्स आहे, जो अँड्रॉइड पाई 9.0 सपोर्टसह येतो. त्याच्यासह येणाऱ्या रिमोटमध्ये गूगल असिस्टंटचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

काय आहे ऑफर?

Tata Sky Binge+ सेट टॉप बॉक्स जर आपल्याला खरेदी करायचा असेल तर फक्त 2,999 रुपये द्यावे लागतील. पूर्वी याच सेट टॉप बॉक्ससाठी 3,999 रुपये द्यावे लागत होते. तथापि, Tata Sky Bing+ सेट टॉप बॉक्सवर 1000 रुपयांच्या कमी किमतीसह 6 महिन्यांचे टाटा स्काय बिंज सब्सक्रिप्शन आणि तीन महिन्यांचे अ‍ॅमेझॉन प्राइम सब्सक्रिप्शन विनामूल्य देण्यात येणार आहे. इतकेच नाही तर Tata Sky Binge+ च्या मल्टी-टीव्ही कनेक्शनची किंमत 1,500 रुपयांनी कमी करून 2,499 रुपये केली गेली आहे. ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर Tata Sky Bing+ बॉक्स नव्या किमतीमध्ये खरेदी करू शकतात.

मिळतील हे फायदे

ऑफर अंतर्गत नवीन ग्राहकांना 6 महिन्यांसाठी Tata Sky Bige+ चे सब्सक्रिप्शन मोफत दिले जात आहे. या सबस्क्रिप्शनमध्ये Disney+ Hotsar, SunNXT, Hungama Play, Shemaroo आणि Eros Now सारखे ओटीटी अ‍ॅप्सचे फ्री सबस्क्रिप्शन देण्यात येत आहे. यासह कंपनीकडून 3 महिन्यांसाठी अ‍ॅमेझॉनचे सबस्क्रिप्शनही दिले जात आहे.