home page top 1

खुशखबर ! ‘TATA SKY’ नं कमी केल्या ‘सेटटॉप’ बॉक्सच्या किंमती, आता ‘फक्त’ 1499 रूपयात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टाटा स्कायने आपल्या ग्राहकांना आणखी स्वस्तात टाटा स्कायची सेवा उपलब्ध करुन दिली आहे. या सणासुदीत टाटा स्कायने आपल्या ग्राहकांना गिफ्ट म्हणून सेट टॉप बॉक्सची किंमती कमी केल्या आहेत. टाटा स्कायने आपल्या एचडी सेट टॉप बॉक्सची किंमत कमी केली असून एसडी बॉक्सची किंमत देखील कमी केली आहे.

टाटा स्कायचा एचडी सेट टॉप बॉक्स फक्त १,४९९ रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. या आधी याची किंमत १,८९९ रुपये होती. तर टाटा स्कायच्या एसडी सेटटॉप बॉक्सची किंमत १,३९९ रुपये आहे.

असे असले तरी ही फक्त सेट टॉप बॉक्सची किंमत आहे. इंस्टॉलेशनसाठी ग्राहकांना वेगळे अतिरिक्त शुक्ल द्यावे लागेल. या किंमतीनंतर आता टाटा स्काय बाजारात स्वत:ला अधिक मजबूत करत आहे.

एअरटेल डिजिटल टीव्हीचा विचार केला तर एचडी सेटटॉप बॉक्सची किंमत ७६९ रुपये असणार आहे. तर एअरटेल डिजिटल टीव्हीचा एसडी सेट टॉप बॉक्सची किंमत ५६९ रुपये आहे. यात तुम्हाला इंस्टॉलेशन शुल्क वेगळे द्यावे लागते.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like