home page top 1

खुशखबर ! DTH कंपन्यांकडून बंपर ऑफर सादर, 120 दिवसांचं सबस्क्रीबशन मिळणार ‘एकदम’ फ्री, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या भारतीय बाजारात इंटरनेट डेटा पॅक ते डीटीएच प्लँन्स मध्ये सध्या टक्कर सुरु आहे. यामुळे सर्व कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कमीतकमी किमतीचे प्लॅन्स सध्या सादर करत आहेत. त्याचबरोबर अनेक ग्राहक मोठ्या कालावधीचे प्लॅन्स घेण्याला प्राधान्य देत असतात. त्यामुळे कमी किमतीत त्यांना जास्त सुविधा देखील मिळत असतात. त्यामुळे कंपन्यांना देखील मोठा फायदा होत असतो. त्यामुळे आता डिश कंपन्या देखील जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

टाटा स्कायची ऑफर

भारतातील सर्वात मोठी डिश कंपनी टाटा स्काय आपल्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सुविधा पुरवत आहे. नवीन प्लॅनमध्ये देखील ते आपल्या ग्राहकांना लवकरच 120 दिवस मोफत सेवा पुरवणार आहेत. टाटा स्कायच्या ग्राहकांना मोठ्या कालावधीच्या रिचार्जवर अनेक फायदे होणार आहेत. एक वर्षाच्या रिचार्जवर टाटा स्काय ग्राहकांना कॅशबॅक ऑफर देणार आहे. यामुळे आता रिचार्जनंतर ग्राहकांना केवळ 2 दिवसांच्या आत कॅशबॅक मिळणार आहे.

यामुळे अन्य डिश कंपन्यांना देखील टक्कर मिळणार आहे. आजच्या कालावधीत केवळ डीटीएच कंपन्याच  केवळ आपल्या ग्राहकांना मोठ्या कालावधीचे उत्तम प्लॅन देत आहे. हि कंपनी 3 महिन्याच्या रिचार्जवर 7 दिवस, सहा महिन्याच्या रिचार्जवर 15 दिवस तर बारा महिन्याच्या रिचार्जवर 30 दिवस मोफत कालावधी देत आहे. त्यामुळे आता 44 महिन्यांच्या रिचार्जवर त्यांना 120 दिवस मोफत कालावधी मिळणार आहे.

दरम्यान, डिश टीव्ही देखील आपल्या  ग्राहकांना हीच सुविधा पुरवता आहे. ते देखील आपल्या ग्राहकांना एका वर्षाच्या रिचार्जवर 30 दिवसांचा मोफत कालावधी देत आहेत. 

visit : Policenama.com 

Loading...
You might also like