खुशखबर ! ‘या’ सेटटॉप बॉक्सची किंमत आणखीच झाली कमी, बनले सर्वात स्वस्त ‘DTH’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टेलीकाॅम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) नवी टॅरिफ व्यवस्था लागू केल्यानंतर डीटीएच आणि ब्रॉडकास्ट इंडस्ट्रीमध्ये बरेच बदल पहायला मिळाले. नवी टॅरिफ व्यवस्था लागू केल्यानंतर अनेक कंपन्यांनी आपले विविध प्लॅन बाजारात आणले आहेत. अनेक कंपन्यानी आपल्या सेटटॉप बॉक्सच्या किंमती कमी केल्या. याच दरम्यान सर्विस प्रोवायडर टाटा स्काईने आपल्या सेटटॉप बॉक्समध्ये पुन्हा एकदा कपात केली आहे.

सेटटॉप बॉक्सच्या किंमती कमी –

टाटा स्कायने आपल्या एचडी आणि एसडी या दोन्ही सेटटॉप बॉक्सच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. टाटा स्कायचा एसडी सेटटॉप बॉक्स आता १,३९९ रुपये किंमतीला उपलब्ध करुन देण्यात आला आहे तर एचडी सेटटॉप बॉक्स १,४९९ रुपयांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या आधी या सेटटॉप बॉक्सच्या किंमती अधिक होत्या. याआधी एसडी सेटटॉप बॉक्स १,६०० रुपये तर एचडी सेटटॉप बॉक्स १,८०० रुपयांना उपलब्ध होते. कंपनीने केलेल्या कपातीनंतर टाटा स्कायचे सेटटॉप बॉक्स हे सर्वात स्वस्त डीटीएच आहे. या नव्या किंमती टाटा स्कायने आपल्या अधिकृत वेबसाइटवर दिल्या आहेत.

रुम टीव्ही सर्विस-

टाटा स्कायने आपल्या ग्राहकांना काही दिवसापुर्वी नवी सुविधा दिली आहेत. ती रुम टीव्ही सर्विस. या नव्या सुविधेत ग्राहक एकाच कनेक्शनवर एका पेक्षा अधिक टीव्ही पाहू शकतात. म्हणजेच टाटा स्कायच्या एकाच आयडीवर एकापेक्षा अधिक टीव्ही पाहिले जाऊ शकतात आणि प्रत्येक टीव्हीत तुमच्या पसंतीचे चॅनेल तुम्ही पाहू शकतात. तर कंपनीने सांगितले आहे की सब्सक्रायबर्सला दुसऱ्या टीव्हीवर चॅनेल पाहायचे असल्यास त्यासाठी वेगळे रिचार्ज करावे लागेल. सब्सक्रायबर्स रुम टीव्ही सेवेचा लाभ www.mytatasky.com वर जाऊन देखील मोबाईल अॅपच्या वापरातून घेऊ शकतात.

 

मागास वर्गीय विद्यार्थ्यांचा भोजन व निवासाचा खर्च शासन उचलणार

कोंढवा दुर्घटनेची सखोल चौकशी करा ; मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

व्यायाम केल्यास ‘मधुमेहात’ होऊ शकते सुधारणा

‘स्मरणशक्ती’ वाढविण्यासाठी हे रामबाण उपाय आवश्य करा