फायद्याची गोष्ट ! 500 रूपयांपेक्षा कमी किंमतीत Tata Sky चे 5 भन्नाट DTH पॅक, जाणून घ्या

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – डीटीएचचा रिचार्ज करणे मोबाइलचा रिचार्ज करण्यापेक्षा खूप अवघड असे काम आहे. कारण, अनेकदा त्यामधील पॅकची माहिती कळत नाही. म्हणून ग्राहकांना सोप्या पद्धतीने याची माहिती मिळावी यासाठी टाटा स्कायने खास पाच बेस्ट असे प्लॅन बाजारात आणले आहेत. या पाचही प्लॅनची किंमत ५०० रुपयांपेक्षा कमी आहे.

>> Marathi Hindi Family Kids Sports HD हा टाटा स्कायचा एक महिन्याची वैधता असणारा प्लॅन आहे. या प्लॅनची किंमत ४७८.३० रुपये आहे. यामध्ये ग्राहकांना एचडी आणि एसडी दोन्ही प्रकारचे चॅनल्स पाहायला भेटतील. त्यात ४१ एचडी आणि ५० एसडी चॅनल्स आहेत. या प्लॅनमध्ये मराठी आणि हिंदीचे अनेक चॅनल्स पाहायला मिळतात. तसेच किड्स, बातम्या आणि गाण्यांची चॅनल्स आहेत.

>> Telugu Family Kids Sports HD हा टाटा स्कायचा दुसरा एक महिन्याची वैधता असणारा प्लॅन आहे. या प्लॅनची किंमत ४४१.९६ रुपये आहे. यामध्ये ग्राहकांना एकूण ३१ एचडी आणि ५० एसडी चॅनल्स मिळतील. हा प्लॅन मनोरंजन, क्रीडा, चित्रपट, किड्स आणि लाइफस्टाईल साठी परफेक्ट आहे.

>> Kannada Family Kids Sports HD हा टाटा स्कायचा तिसरा एका महिन्याची वैधता असणारा प्लॅन आहे. या प्लॅनची किंमत ४०१.५१ रुपये आहे. यामध्ये ग्राहकांना २८ एचडी आणि ४५ एसडी चॅनेल्स मिळतात. या प्लॅनमध्ये ग्राहकांना जास्तीत जास्त कन्नड चॅनल्स मिळतील. तसेच काही हिंदी चॅनल्स चा सुद्धा त्यामध्ये समावेश आहे. त्यात चित्रपट, मनोरंजन, किड्स आणि क्रीडाच्या चॅनल्सचा समावेश आहे.

>> Telugu Malayalam Basic HD हा टाटा स्कायचा चौथा एक महिन्याची वैधता असणारा प्लॅन आहे. या प्लॅनची किंमत ३४३.४९ रुपये आहे. त्यामध्ये ग्राहकांना १९ एचडी आणि ४३ एसडी चॅनल्स मिळतील. तसेच यामध्ये जास्तीत जास्त तेलुगु आणि मल्याळम चॅनेल्स आहेत.

>> Telugu Basic HD हा टाटा स्कायचा पाचवा आणि सर्वात स्वतःत मस्त असा प्लॅन आहे. या प्लॅनची किंमत २०८.९८ रुपये आहे. यामध्ये ग्राहकांना तेलुगु सोबत हिंदी चॅनेल्स पाहायला मिळतील. तसेच ११ एचडी आणि १५ एसडी चॅनल्सचा समावेश आहे.