टाटा ग्रुपनं ‘कोरोना’शी लढण्यासाठी दान केले 1500 कोटी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशावर आलेल्या प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी टाटा ग्रुपकडून अनेकवेळा योगदान दिले आहे. टाटा ट्रस्टने कोरोनाशी लढण्यासाठी 500 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केल्यानंतर आता टाटा सन्सने देखील 1000 कोटी रुपयांची अतिरिक्त मदत जाहीर केली आहे. टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी सांगितले की, कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी आणि गरजा भागवण्यासाठी तातडीची आपत्कालीन संसाधनांची गरज आहे.


मागील 70 वर्षातील सर्वात मोठं संकट सध्या कोरोना आणि देशातील लॉकडाऊनकडे पाहिले जात आहे. या संकटासाठी अनेक स्वयंसेवी आणि सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेतला आहे आणि घेत आहेत. आपल्या परीने जेवढी शक्य असेल तेवढी मदत या संस्थांकडून, व्यक्तींकडून केली जात आहे. टाटा कंपनी आणि ग्रुपने यापूर्वी देशावर आलेल्या संकटाच्यावेळी आपलं योगदान दिलं आहे. आता देशात कोरोनाचे संकट आले असून या संकटाचा सामना करण्यासाठी टाटा ग्रुपने आपले योगदान दिले आहे. सध्याच्या काळाची गरज आणि वेळेपेक्षा आपलं योगदान देण्याची हीच ती वेळ असल्याचे टाटा यांनी सांगितले आहे. टाटा समूहाकडून वैद्यकीय उपकरणे आणि वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या खरेदीसाठी 500 कोटी रुपये देण्यात येत आहे. असे पत्र रतन टाटा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरूनन शेअर केली आहे.
हीच ती वेळ


सध्या देशाला आणि जगाला कोरोना व्हायरसने घेरले आहे. आपण कृती करण्याची हीच वेळ आहे. कोरोनाविरुद्ध मानवजातीची रेस सुरु झाली आहे. त्यामुळे या रेसमध्ये सहभागी होत, टाटा ग्रुपकडून कोरोनाच्या लढाईसाठी वैद्यकीय साहत्य अन् अत्यावश्यक गरजांसाठी 500 कोटी रुपये जाहीर करत असल्याचे सांगण्यात आले आहे. हीच ती वेळ असे म्हणत.. एकप्रकारे इतरही उद्योजकांना टाटा यांनी देशसेवेत सहभागी होण्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले आहे.