वाद वाढला, मिस्त्री कुटुंबाच्या प्रस्तावाला टाटा ग्रुपने म्हटले ’नॉनसेंस’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   टाटा ग्रुप आणि सायरस मिस्त्री यांच्यात मागील सुमारे 4 वर्षापासून कायदेशीर लढाई सुरू आहे. गुरुवारी सुद्धा सुप्रीम कोर्टात या प्रकरणावरून जोरदार युक्तीवाद झाला. टाटा सन्सपासून वेगळे होण्यासाठी शापूरजी पलोनजी (एसपी) समुहाने जो प्रस्ताव सुप्रीम कोर्टात ठेवला होता, त्यास टाटा ग्रुपने मान्य करण्यास नकार दिला आहे.

कारण, मिस्त्री कुटुंबाच्या नियंत्रणातील शापूरजी पलोनजी (एसपी) ग्रुपने सुप्रीम कोर्टात दावा केला आहे की, टाटा सन्समध्ये त्यांच्या 18.4 टक्के भागीदारीचे मुल्य सुमारे 1.75 लाख कोटी आहे, जे टाटा ग्रुपने फेटाळले आहे. गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान टाटा ग्रुपचे प्रतिनिधीत्व करणारे वरिष्ठ वकिल हरीश साळवे यांनी यास ’नॉनसेंस’ प्रस्ताव म्हटले. त्यांनी म्हटले की, अशा प्रकारचा दिलासा दिला जाऊ शकत नाही, टाटा ग्रुप याचा विरोध करत आहे.

सीनियर वकिल हरीश साळवे यांनी म्हटले, टाटा सन्समध्ये शापूरजी पालोनजी ग्रुपच्या 18.4 टक्के भागीदारीचे मुल्य 80,000 कोटीपेक्षा जास्त नाही. यापूर्वी टाटा सन्समध्ये शापूरजी पालोनजीच्या भागीदारीच्या मुल्यावरून 8 डिसेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली होती.

मागील काही दिवसांपूर्वी शापोरजी पालोनजी ग्रुपने सुप्रीम कोर्टात म्हटले होते की, ते टाटा सन्समधील आपली भागीदारी विकून बाहेर पडण्यास तयार आहेत. यासाठी मिस्त्री कुटुंबाचा दावा आहे की, टाटा सन्समधील त्यांच्या 18.4 टक्के भागीदारीचे मुल्य 1.75 लाख कोटी आहे.

मिस्त्री कुटुंबाच्या मालकीच्या शापूरजी पलोनजी (एसपी) समूहाने सुप्रीम कोर्टात सांगितले की, भागीदारीचे मुल्यांकन सर्व सूचीबद्ध शेयर्स, विना-सुचीबद्ध शेयर्स, ब्रँड, रोकड आणि स्थिर संपत्तीच्या हिशेबाने केले आहे.

शापूरजी पालोनजी ग्रुपच्या आपल्या दोन सबसिडियरी कंपन्या -सायरस इन्व्हेस्टमेंट आणि स्टर्लिंग इन्व्हेस्टमेंटद्वारे टाटा सन्समध्ये एकुण 18.4 टक्के भागीदारी आहे. यावर्षी 29 ऑक्टोबरला शापूरजी ग्रुपने सुप्रीम कोर्टात टाटा ग्रुपापासून वेगळे होण्याचा प्रस्ताव सादर केला होता.

मिस्त्री कुटुंबातील सर्वात महत्वाचे सदस्य सायरस मिस्त्री यांना 2012 मध्ये टाटा सन्सचे चेअरमन बनवण्यात आले होते, परंतु 2016 मध्ये त्यांना या पदावरून हटवण्यात आले होते. यानंतर दोन्ही पक्षांमध्ये मोठी कायदेशीर लढाई सुरू झाली, जी अजूनही सुरूच आहे. शापूरजी पालोनजी समूह आणि टाटांचा संबंध सुमारे सात दशक जुना आहे.

यापूर्वी 18 नोव्हेंबर 2019 ला एनसीएलएटीने सायरस मिस्त्री यांना दुसर्‍यांचा चेयरमन पद देण्याचा निर्णय सुनावला होता. या निर्णयाला टाटा सन्सने आव्हान दिले. यानंतर सुप्रीम कोर्टाने 10 जानेवारी 2020ला एनसीएलएटीच्य निर्णयावर स्थगिती लावली होती.