TATA सन्सने सर्वोच्च न्यायालयात जिंकली कायदेशीर लढाई ! सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावरून हटविलं ते योग्यच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टाटा सन्सने सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई जिंकली आहे. याचा सायरस मिस्त्री यांना झटका बसला आहे. सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावरून हटविलं ते योग्यच केलं, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी टाटा सन्सच्या बाजूने निकाल दिला आहे. हा टाटा सन्सचा मोठा विजय आहे तर, याचा सायरस मिस्त्रीला मोठा झटका बसला आहे. ऑक्टोबर 2016 मध्ये सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून अचानक काढून टाकण्यात आले. त्यानंतर सायरस मिस्त्री यांनी टाटा सन्सविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. नॅशनल कंपनी लॉ अपीलेट ट्रिब्यूनल (एनसीएलएटी)ने सायमन मिस्त्री यांच्या बाजूने निकाल दिला होता. तसेच नॅशनल कंपनी लॉ अपीलेट ट्रिब्यूनल (एनसीएलएटी) ने सायरसला पुन्हा अध्यक्षपदावर ठेवण्याचे आदेश दिले होते. म्हणून नॅशनल कंपनी लॉ अपीलेट ट्रिब्यूनल (एनसीएलएटी)च्या या निर्णयाच्या विरोधात टाटा सन्सने सन 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

ज्यात आज सर्वोच्च न्यायालयाने टाटा सन्सच्या बाजूने निकाल दिला आहे. ज्यानंतर सायरस मिस्त्री आणि टाटा सन्स यांच्यात कायदेशीर लढाई आज संपुष्टात आली आहे. यांसह एससीने 10 जानेवारी 2020 रोजी नॅशनल कंपनी लॉ अपील ट्रिब्यूनल (एनसीएलएटी) च्या निर्णयाला स्थगिती दिली आणि सर्वोच्च न्यायालयाने सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावरून काढून टाकणे योग्य आहे, असे असल्याचे म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने तो आदेश रद्दबातल केला ज्याने सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावर पुन्हा बसण्याची परवानगी देण्यात आली होती. सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांनी नॅशनल कंपनी लॉ अपीलेट ट्रिब्यूनल (एनसीएलएटी)चा आदेश नाकारताना टाटा समूहाच्या सर्व याचिका स्वीकारत मिस्त्री समूहाच्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने शेअर स्टॉकशी संबंधित प्रकरणे टाटा सन्स आणि सायमन मिस्त्री यांना एकत्रित बसून ते सोडवावे लागतील, असेही म्हंटले आहे. टाटा सन्सच्या 100 अब्ज डॉलर समूहासाठी हा मोठा विजय आहे.

अध्यक्षांना काढून टाकणे चुकीचे नाही, असे टाटा समूहाने म्हटले आहे. न्यायाधीश ए.एस. बोपन्ना आणि न्यायमूर्ती व्ही. राम सुब्रमण्यम यांच्या खंडपीठाने 17 डिसेंबरला याचा निर्णय सुरक्षित राखून ठेवला होता. शहापूरजी पलोनजी (एसपी)ने 17 डिसेंबरला त्या न्यायालयात असे सांगितले होते की, ऑक्टोबर 2016 मध्ये झालेल्या बोर्ड बैठकीत सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून काढून टाकणे हे ब्लड स्पोर्ट आणि घातपात आणि नियमांचे पूर्ण उल्लंघन करण्यासारखेच होते. दुसरीकडे टाटा समूहाने कोणतेही आरोप केले नाहीत आणि बोर्ड मिस्त्री काढून टाकणे आपल्या अधिकारात आहे, असे म्हणत या आरोपांचा तीव्र विरोध केला होता.

कायदेशीर लढाईत टाटा सन्स जिंकले!
टाटा सन्सने कायदेशीररित्या अध्यक्ष पदावरून झालेल्या वादााची लढाई जिंकली आहे. त्यांनी बोर्ड मिटींगमध्ये घेतलेल निर्णय योग्य असल्याचंही नमूद केलं आहे. टाटाच्या अध्यक्षपदी कोण राहणार ? आणि त्याला हटविण्याचा अधिकार बोर्ड मिटींगला आहे, हे आता पुन्हा एकदा सिध्द झालं आहे. त्यामुळे आता सायरस मिस्त्री यांनी हे अध्यक्षपद मिळविले होते ते चुकीचे होते, असे आता समजत आहे.