Tata Steel Company | टाटा स्टीलमध्ये काम करणार्‍यांसाठी खुशखबर ! कंपनीने केली एकुण 270.28 कोटींच्या बोनसची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Tata Steel Company | टाटा स्टील कंपनी (Tata Steel Company) ने आपल्या सर्व पात्र कर्मचार्‍यांना 2020-21 मध्ये एकुण 270.28 कोटी रुपयांचा वार्षिक बोनस देण्याची घोषणा (announced an annual bonus) केली आहे. कंपनीने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, 2020-2021 चा वार्षिक बोनस देण्यासाठी टाटा स्टील आणि टाटा वर्कर्स युनियन (Tata Workers Union) मध्ये बुधवारी एका करारावर हस्ताक्षर ( agreement signed) करण्यात आले. यानंतर कंपनीचे सर्व लागू डिव्हिजन आणि युनिटच्या पात्र कर्मचार्‍यांना एकुण 270.28 कोटी रुपयांचा बोनस दिला जाईल.

यापैकी ट्यूबसह जमशेदपुरच्या विविध विभागांना 158.31 कोटी रुपयांची बोनस रक्कम दिली जाईल. कंपनीकडून कर्मचार्‍यांना किमान वार्षिक बोनस 34,920 रुपये आणि कमाल वार्षिक बोनस 3,59,029 रुपये दिला जाईल.

या लोकांनी केले करारावर हस्ताक्षर

कंपनीकडून CEO आणि MD टी. व्ही. नरेंद्रन, HRM व्हाईस प्रेसिडेंट अत्रेयी सान्याल, आणि इतर वरिष्ठ अधिकार्‍यांनी मेमोरेंडमवर आपले हस्ताक्षर केले.
तर वर्कर्स युनियनकडून टाटा वर्कर्स युनियनचे अध्यक्ष संजीव कुमार चौधरी, टाटा वर्कर्स युनियनचे
उपाध्यक्ष शैलेश कुमार सिंह, वर्कर्स युनियनचे महासचिव सतीश कुमार सिंह आणि इतर पदाधिकार्‍यांनी आपले हस्ताक्षर केले.

 

याशिवाय, स्टील कंपनी आणि इंडियन नॅशनल मेटल वर्कर्स फेडरेशन (INMWF) आणि राष्ट्रीय कोलियरी मजदूर संघ (RCMS) मध्ये एक करारावर सुद्धा हस्ताक्षर करण्यात आले.
कोळसा, खाण आणि FAMD च्या कर्मचार्‍यांना सुद्धा एकुण 78.04 कोटी रुपयांचा वार्षिक बोनस दिला जाईल.

टिस्को मजूर युनियनसोबत झाला करार

टाटा स्टील आणि टिस्को मजूर युनियनमध्ये बुधवारी आणखी एक करारावर हस्ताक्षर करण्यात आले. ज्यानुसार कंपनीकडून ग्रोथ शॉपसाठी वार्षिक बोनस जवळपास 3.24 कोटी रुपये केला जाईल.

 

Web Title : Tata Steel Company | tata steel announced 270 crore total bonus for fy 2020 and2021

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

RBI New Guideline on Bank Lockers | बँक लॉकरसाठी RBI ची नवीन गाईडलाईन, चोरी झाल्यास 100 पट मिळेल भरपाई; जाणून घ्या

Health Tips | दिवसा नव्हे, रात्री अंघोळ केल्याने होतात जबरदस्त फायदे; निद्रानाश, अ‍ॅलर्जी, मसल्स क्रॅम्पपासून मिळतो दिलासा

PNB ग्राहकांसाठी खुशखबर ! 30 सप्टेंबरपर्यंत लोनवर लागणार नाही प्रोसेसिंग फी, डॉक्युमेन्टेशन चार्जसुद्धा पूर्णपणे माफ