पोलीस ठाण्यातून टाटा सुमो चोरीला

वडगाव मावळ (पुणे) :  पोलीसनामा ऑनलाईन

पुणे ग्रामीण पोलिसांच्या नाकाखालून चोरट्यांनी दरोड्याच्या गुन्ह्यात जप्त केलेली तीन लाख रुपये किंमतीची टाटा सुमो (एमएच १४ बीए ४०८०) चोरून नेली. चोरट्यांनी पोलीस ठाण्याच्या समोर पार्क केलेली गाडी चोरून नेल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस ठाण्यात जप्त करुन आणलेली वाहने सुरक्षीत नाहीत तर सर्वसामान्यांचे काय असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. ही घटना पुणे ग्रामीणच्या वडगाव मावळ पोलीस ठाण्यात घडली असून सोमवारी (दि.८) सकाळी दहा वाजता हा प्रकार उघकीस आला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’37d8661e-cd4b-11e8-9c1c-6f6dd4266097′]

याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार रमेश सोपानराव गुंडेवाड यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

[amazon_link asins=’B00IZ97K3I,B00N2G0428′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’49893531-cd4b-11e8-8b0e-7f7325c1719e’]

पोलीस ठाण्याच्या आवारातूनच जप्त केलेली गाडी चोरीला गेल्याने पोलीस किती बेफिकीर आहेत हे दिसून येते. पोलीस आपल्या पोलीस ठाण्याचीच सुरक्षा करु शकत नाहीत तर आपल्या परिसराची काय सुरक्षा करणार. आपल्या परिसराच्या सुरक्षितेच्या दृष्टीने किती गंभीर आहेत हेच या प्रकारावरुन समजते.

पुणे होर्डिंग दुर्घटना प्रकरण  : कॅप्शन जाहिरात कंपनीच्या मालकाला बेड्या

पुणे ग्रामीणमधील वडगाव मावळ पोलिसांनी दरोड्याच्या गुन्ह्यात वापरलेली टाटा सुमो जप्त केली होती. चोरट्यांनी सुमो गाडी चोरुन नेल्याने पोलिसांनी गाडीचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, गाडी न मिळाल्याने अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसांनाच फिर्याद द्यावी लागली. चोरट्यांनी ही गाडी क्रेनच्या सहाय्याने चोरुन नेली. क्रेनच्या सहाय्याने गाडी चोरुन नेणे खूप अवघड काम आहे. यावरुन पोलीस किती कर्तव्य दक्ष काम करतात हे लक्षात येते. त्यामुळेच चोरट्यांनी क्रेनच्या सहाय्याने गाडी चोरुन नेली तरी पोलिसांना त्याचा थांगपत्ता नाही. या घटनेचा तपास वडगाव मावळ पोलीस करित असून संशयीतांना ताब्यात घेऊन चौकशी करीत आहेत.