Tata Vs Ambani | रिलायन्स इंडस्ट्रीजपासून फक्त इतकी मागे आहे रतन टाटांची ‘ही’ कंपनी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Tata Vs Ambani | शेयर बाजारात (stock market) टीसीएस (TCS) आणि रिलायन्स (Reliance) ची रायव्हलरी लपू शकत नाही. दोन्ही कंपन्या मार्केट कॅपच्या बाबतीत एकमेकांना टक्कर देताना दिसतात. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) मार्केट कॅपच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठी कंपनी आहे, परंतु टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (Tata Consultancy Services) लवकरच देशातील सर्वात मोठी कंपनी बनू शकते. दोन्हींमध्ये अवघे 70 हजार कोटी रुपयांचे अंतर आहे. दोन्ही कंपन्यांचे मार्केट (Tata Vs Ambani) किती झाले आहे हे आकड्यांवरून जाणून घेवूयात…

टीसीएसने केला नवीन विक्रम (TCS sets new record) :

टाटा ग्रुपची सर्वात मोठी कंपनी टीसीएसच्या शेयरने आज शेयर बाजारात नवीन विक्रम करत 52 आठवड्यांच्या नवीन उंचीवर पोहचला.
विशेष म्हणजे कंपनीच्या शेयरने 3500 रुपयांची पातळी ओलांडली आहे आणि कंपनीचा शेयर 3550 रुपयांपेक्षा जास्त व्यवहार करत आहे.
तर व्यवहाराच्या सत्रातील शेयर प्राईस 3560 रुपये प्रति शेयरवर पोहचली होती.

कंपनीचे मार्केट कॅप 13.15 लाख कोटी रुपयांच्या पुढे :

कंपनीच्या शेयरमधील तेजीमुळे टीसीएसचे मार्केट कॅप 13.15 लाख रुपयांच्या पुढे व्यवहार करत आहे. ही देशातील दुसरी कंपनी आहे जिचे मार्केट कॅप 13 लाख कोटी रुपयांवर पोहचले आहे.
यापूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप 13 लाख कोटी रुपयांवर पोहचले आहे.
दोन्ही कंपन्यांमध्ये एकमेकांना मागे टाकण्याची स्पर्धा असते.

 

रिलायन्सच्या किती माग आहे टीसीएस :

टीसीएस आणि रिलायन्सच्या मार्केट कॅपमध्ये खुप कमी अंतर दिसून येत आहे.
प्रत्यक्षात जिथे टीसीएसचा शेयर सुमारे 2.50 टक्केच्या तेजीसह व्यवहार करत आहे.
तर दुसरीकडे रिलायन्सच्या शेयरमध्ये आज किरकोळ घसरण दिसून आली.
त्यानंतरही कंपनीचे मार्केट कॅप 13.71 लाख रुपयांच्या जवळपास आहे.
म्हणजे दोन्ही कंपन्यांमध्ये मार्केट कॅपचे अंतर अवघे 55 हजार कोटी रुपयांच्या जवळपास आहे.
जे टीसीएस कधीही पार करू शकते.

 

Web Title : tata vs ambani ratan tata this company is only left behind from reliance industries

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

BJP Leader Killed | काश्मीरमध्ये आणखी एका BJP नेत्याची गोळी मारून हत्या, 2 वर्षात दहशतवाद्यांनी 21 जाणांना बनवले ‘निशाणा’

Anti Corrupation Pune | पुण्यातील महिला लिपिक 3450 रूपयांची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात, प्रचंड खळबळ

MNS Vs Sambhaji Brigade | प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तकं पाठवली थेट ‘कृष्णकुंज’वर; वाद चिघळणार?