टाटांचा मुलगा आणि किर्लोस्करांची मुलगी ‘विवाह’बंधनात ; दोन सुप्रसिध्द उद्योग घराणी नव्या नात्यामुळं ‘एकत्र’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टाटा हे भारतीय उद्योग जगातील सर्वात जुने आणि अनुभवी नाव आहे. तर भारतात किर्लोस्कर ब्रदर्स या कंपनीचे नाव महाराष्ट्रात आहे. हे उद्योग जगतातील दोन मोठी नावे आता एकत्रित झाली आहेत. दोन्ही कुटुंबात आता एक नाते निर्माण होत आहे. नेविल टाटा आणि मानसी किर्लोस्कर यांनी रविवारी मुंबईमध्ये अगदी साध्या पद्धतीने लग्न केले आहे. नेविल हा रतन टाटा यांचे बंधु नोएल टाटा यांचे सुपुत्र आहेत. तर मानसी ही विक्रम आणि गीतांजली किर्लोस्कर यांची मुलगी आहे.

नेविल आण मानसी यांचा साखरपुडा ६ महिन्यांपूर्वीच झाला होता. त्यानंतर त्यांनी आता लग्न केले आहे. नेविल आणि मानसी यांच्या लग्नाचे मोठे आयोजन न करता साधे पद्धतीने केले आहे. दक्षिण मुंबईमध्ये दोघांचे लग्न पार पडले. या लग्नात जवळचे नातेवाईक आणि काही मित्रपरिवार सामिल झाला होता. या लग्नात जवळच्याच लोकांना बोलावण्यात आले होते. या लग्नात मोठे सेलेब्रिटी दिसले नाही.

नेविल आणि मानसी हे दोघे कोठेही कमी नसून आपापल्या घरगुती व्यवसायामध्ये मोलाचे योगदान देतात. नोएल टाटा हे ट्रेंड आणि टाटा इंटरनॅशनल या कंपनीचे प्रमुख आहेत. तर नेविल वर टाटा ट्रेंड कंपनीमधील एका डिपार्टमेंटची जबाबदारी आहे. तसंच त्याच्यावर टाटा ट्रेंड्स वेस्टसाइड ब्रँडची जबाबदारी आहे. तर मानसीही तिच्या घरातील व्यवसायामध्ये मोलाचे योगदान देते. मानसी वडिलांच्या टोयोटा किर्लोस्कर मोटर्स कंपनीची उपाध्यक्ष आहे. मानसी कंपनीमधील सिस्टम डिपार्टमेंटचे काम पाहते. त्यामुळे दोघे कामाच्या बाबतीत एकमेकांना साजेसे आहेत.

 

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like