टॅटूचं आकर्षण आणि दुखणं

पोलीसनामा ऑनलाईन टीम – हल्ली टॅटू काढण्याचं फॅशन दिवसेंदिवस वाढत आहे ; पण घाईगडबडीमुळे हे टॅटू दुखणं ठरत असल्याची अनेक उदाहरणे पाहावयास मिळत आहे. विशेषतः तरुणींमध्ये सध्या फॅशन स्टेंटमेंट म्हणून टॅटू काढणं हे अगदी नेहमीचं झालंय. अर्थात कळत नकळत जरासा निष्काळजीपणा किंवा दुर्लक्ष झालं तर टॅटू हे दुखणं ठरू शकतं. म्हणून टॅटू काढून झाल्यानंतर त्याची योग्य काळजी घेतली गेली पाहिजे. कशी घ्यायची ही काळजी ? पाहू या

टॅटू काढून झाल्यावर टॅटू मेकरचा सल्ला तुम्हाला उपयोगी पडेलच; पण पुढील काही गोष्टी आधीच लक्षात घेतल्यास नंतर काळजी करण्याची वेळ येण्याची शक्यता कमी होईल. टॅटू काढून घेतल्यावर तो कसा दिसतोय हे पाहण्यासाठी काहीजणी फार उतावीळ होतात आणि टॅटू काढून झाल्यानंतर त्यावरील प्लास्टिक कव्हर अर्थात क्लिगं रॅप लगेचच काढून टाकतात. पण तसं करणं योग्य नाही. त्याचा त्रास होऊ शकतो म्हणून संयम बाळगा.

टॅटू काढल्यानंतर किमान दोन तास तरी हा क्लिगं रॅप काढू नका. टॅटू काढून झाल्यावर थोड्या वेळाने क्लिगं रॅप काढा आणि त्यानंतर अल्कोहोल फ्री साबण, लिक्विड सोप किंवा हँड वॉशनं टॅटू हलक्या हातानं धुवा. जोरजोरानं घासू नका. टॅटू हलकेच धुतल्यानंतर लगेचच टिश्यू पेपरनं तो कोरडा करा. त्यावर पाणी ठेवू नका. त्याला घासू नका किंवा जास्तीचं पाणी पुसण्यासाठी टॉवेलही वापरू नका. टॉवेलची घाण टॅटूला लागून इन्फेक्शन होऊ शकतं.

टॅटूच्या अवतीभोवतीचं रक्तपुसण्यासाठी स्पंज, अँटिसेप्टिक क्रीम कधीही स्वत:च्याच मनानं लावू नका. यासाठी टॅटू मेकरचा सल्ला घ्या. आणि मुख्य म्हणजे तो पाळा. काही दिवस नव्या टॅटूला सारखा हात लावू नका.