टॅटू काढण्याचा विचार करताय ? हे वाचा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अनेक खेळाडून तसेच अभिनेते आणि इतर सेलेब्रिटी आपल्या शरीरावर टॅटू मिरवताना दिसत आहेत. या लोकांचे अनुकरण करत अनके सामान्य नागरिकही आपल्या शरीरावर टॅटू काढायला मागेपुढे पाहत नाहीत. तुम्हीदेखील तुमच्या शरीरावर टॅटू काढण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा आणि हे वाचा. कारण याबद्दल आपण एक महत्त्वाची माहिती घेणार आहोत. कारण तुम्ही तुमच्या शरीरावर काढलेल्या टॅटूचा थेट संबंध तुमच्या मानसिक आरोग्याशी असतो. होय हे खरं आहे.

टॅटू काढणं तुमच्या मानसिक आरोग्यासाठी घातक ठरू शकतं असा इशारा संशोधकांनी दिला आहे. याबाबत अमेरिकेमधील ‘मियामी युनिव्हर्सिटी’तील शास्त्रज्ञांनी हे महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. या संशोधनाबाबत सांगताना संशोधकांनी म्हटले आहे की, “टॅटू’ हा मानसिक समस्या आणि झोपेसंबंधीच्या आजारांचे कारण बनू शकतो. तसे पाहिल्यास टॅटूचा आरोग्याशी तसा महत्त्वाचा संबंध असल्याचे संशोधनात आढळून आलेला नाही. मात्र, शरीरावर टॅटू काढणार्‍या लोकांमध्ये मानसिक व झोपेसंबंधीच्या समस्या निर्माण होऊ शकतात.”

तब्बल 2008 लोकांना एकत्र करून याबाबत संशोधन करण्यात आले आहे. याबाबत माहिती देताना मियामीचे प्रोफेसर कॅरोलिन मॉर्टेसन यांनी सांगितले की, “यापूर्वी करण्यात आलेल्या एका संशोधनामध्ये टॅटू आणि मानसिक आरोग्य संबंध असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, सध्याच्या युगात महिला आणि पुरुषांमध्ये टॅटूबाबतची लोकप्रियता वाढू लागली आहे. असे असतानाच नव्या संशोधनामध्ये टॅटू, मानसिक आरोग्य व झोपेसंबंधीच्या समस्या यांच्यात संबंध असल्याचे निष्पन्‍न झाले आहे.”त्यामुळे टॅटू काढताना सावधानता बाळगण्याचा सल्लाही त्यांनी दिला.