कलम ३७० हटवल्यानंतर ‘टॅटू’ मार्केटमध्ये प्रचंड ‘उलाढाल’, PM मोदी आणि HM शाहांची ‘बल्लेबल्ले’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू कश्मीर मधून कलम ३७० रद्द केल्यानंतर संपूर्ण देशातून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. सोशल मीडियासह सर्वच स्तरावर तरुणाईने जल्लोष साजरा केला. आता मात्र हाच आनंद व्यक्त करण्यासाठी काही लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे टॅटू काढायला सुरवात केली आहे, तर काही लोकांनी भारताचा नकाशा आणि झेंडा टॅटू स्वरूपात काढायला सुरुवात केली आहे. टॅटू आर्टिस्टने दिलेल्या माहितीनुसार, काही लोकांनी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी टॅटू काढण्यास सुरुवात केली.

देशभक्तीच्या टॅटूची क्रेझ
टॅटूची क्रेझ तशी अनेकांना असते मात्र देशभक्तीपर टॅटू काढणारे फार कमी जण असतात. सध्या मार्केटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, सत्यमेव जयते, तिरंगी झेंडा अशा टॅटूची क्रेझ मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. याव्यतिरिक्त तरुणाई आर्मी, भगतसिंह यांचे पोट्रेट टॅटू सुद्धा काढत आहे.

टॅटूच्या किमती…
टॅटू आर्टिस्टच्या सांगण्यानुसार, साधारण टॅटूची किंमत ४००० ते ५००० इतके असते, मात्र पोट्रेट टॅटूची किंमत तब्बल १०,००० ते ५०,००० पर्यंत जाते. टॅटूच्या आकारावरून त्याची किंमत ठरवली जाते. सध्या मोदी आणि अमित शाह यांच्या पोट्रेट टॅटूची खूप क्रेझ आहे.

आरोग्यविषयक वृत्त –