महाराष्ट्र राज्य कोळी महासंघाच्या इंदापूर तालुका अध्यक्षपदी कळंब येथील तात्यासाहेब मंजाबा घाटे यांची निवड

वालचंदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष आमदार रमेश दादा पाटील यांच्या सहिनीशी पत्र तात्यासाहेब घाटे यांना पुणे येथे राज्य युवकाध्यक्ष चेतन पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.

गेल्या ९ वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून कोळी समाजातील प्रश्नांना न्याय देण्याबरोबर इंदापूर तालुक्यातील पाहिले वाल्मिकी समाज मंदीर उभारण्यासाठी दिलेले योगदान समाजातील अडीअडचणी सोडविण्यासाठी दिलेला लढा आदी बाबी लक्षात घेऊन जिल्हाध्यक्ष राजेंद्र हजारे यांनी निवड केली. निवडीनंतर नूतन तालुकाध्यक्ष तात्यासाहेब घाटे यांनी सांगितले की ; कोळी समाज हा मागास असूनही त्यांना अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने अनेकांना रोजगार उपलब्ध होत नाही. नोकरदारांना अडचणी निर्माण होत आहेत.पात्रता असूनही कोळी समाजाला हक्कापासून वंचित ठेवले जात आहे. त्यांना शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागले आहे. यापुढील काळात महाराष्ट्रातील तमाम कोळी समाजाला महादेव कोळी ( एस. टी.) चे दाखले मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी घाटे यांनी सांगितले.