विक्रीकर अधिकारी, कर सल्लागार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – GST नंबर बंद करणेसाठी चार हजार लाच घेतल्याप्रकरणी विक्रीकर अधिकारी व करसल्लागारास ‘एसीबी’ने अटक केली आहे. श्रीरामपूरमध्ये आज दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे.

सुनिल भास्कर टकले (वय 35, विक्रीकर अधिकारी, वस्तू व सेवाकर विभाग, अहमदनगर. रा- प्लाॅट नं. 15, पंचवटी काॅलनी, केडगाव, अहमदनगर), निलेश सुरेश हरदास(वय 32, कर सल्लागार. रा. बेलापूूर खु., ता- श्रीरामपूर, जि.अहमदनगर) ही अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांनी त्यांचे पत्नीचे नावे व्यवसाय करणेसाठी GST नंबर डिसेंबर 2018 मध्ये काढला होता. परंतु, काही कारणास्तव ते व्यवसाय सुरु करु शकले नाहीत. म्हणून त्यांनी GST नंबर बंद करणेसाठी कर सल्लागार हरदास यांचे मार्फत Online अर्ज केला होता. सदर खातेवर होणारा दंड न भरता खाते बंद करण्यासाठी कर सल्लागार हरदास यांनी लोकसेवक टकले यांच्यासाठी म्हणून तडजोडी अंती 3 हजार 500 रुपये लाच व स्वतःसाठी 500 रुपये कमिशन म्हणून एकूण 4 हजार रुपये लाचेची मागणी केली.

लाच मागणी पडताळणी दरम्यान पंचासमक्ष करून ती लाचेची रक्कम आज श्रीरामपूर शहरात हरीकमल प्लाझामधील टकले यांचे कार्यालयात आयोजित लाचेच्या सापळा रचला होता. तेथे चार हजार घेताना रंगेहाथ पकडले. पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या नेतृत्वाखाली नगरच्या पथकाने ही कारवाई करण्यात आली.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like