नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Tax And Investment Related Work Before 31 March | आर्थिक वर्ष 2021 – 22 संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. अशा स्थितीत कर आणि बचतीशी संबंधित सर्व पेंडिंग कामे वेळेत होणे आवश्यक आहे. कर बचतीशी संबंधित अशा अनेक योजना आहेत, ज्यामध्ये प्रत्येक आर्थिक वर्षात किमान रक्कम जमा करावी लागते. या योजनांमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी Public Provident Fund (PPF), राष्ट्रीय पेन्शन योजना National Pension Scheme (NPS) आणि सुकन्या समृद्धी योजना Sukanya Samriddhi Yojana (SSY) इत्यादींचा समावेश आहे. (Tax And Investment Related Work Before 31 March)
या योजनांमध्ये दरवर्षी किमान रक्कम जमा करावी लागते. अन्यथा, या योजनांशी जोडलेली खाती निष्क्रिय होतात, ज्यामुळे पॉलिसीधारकाला पुढील गुंतवणूक करण्यासाठी ते नियमित करणे आवश्यक असते.
खाते नियमित करण्यासाठी खुप वेळ द्यावा लागतो आणि दंडही भरावा लागतो. अशावेळी, आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी या खात्यांमध्ये किमान रक्कम जमा करणे चांगले ठरते.
1. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)
जर तुम्ही 31 मार्चपर्यंत तुमच्या पीपीएफ खात्यात किमान रक्कम जमा करू शकला नाहीत, तर तुम्हाला 50 रुपये दंड भरावा लागेल.
पीपीएफ खात्यात किमान 500 रुपये जमा करणे आवश्यक आहे.
जितक्या वर्षांपर्यंत तुम्ही तुमच्या खात्यात पैसे जमा करत नाही, तितक्या वर्षांसाठी तुम्हाला विलंब शुल्क आणि किमान रक्कम जमा करावी लागेल.
याशिवाय तुम्ही कोणत्याही आर्थिक वर्षात 500 रुपये जमा न केल्यास तुमचे खाते निष्क्रिय मानले जाईल. (Tax And Investment Related Work Before 31 March)
जोपर्यंत खाते पुन्हा सक्रिय करत नाही तोपर्यंत निष्क्रिय खात्याला जमा रक्कमेवर कर्ज किंवा ठेवीतील आंशिक पैसे काढण्याची सुविधा मिळत नाही. निष्क्रिय खाते मॅच्युरिटी तारखेपूर्वी सक्रिय करणे आवश्यक आहे. मॅच्युरिटी तारखेनंतर खाते सक्रिय केले जाऊ शकत नाही.
—
2. राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS)
एनपीएसच्या टियर – 1 खात्यात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान रु 1,000 जमा करणे आवश्यक आहे.
यात जमा करण्याची कोणतीही कमाल मर्यादा नाही. टियर – 2 खात्यांमध्ये किमान ठेव रकमेची आवश्यकता नाही.
तुमचे टियर -1 खाते असल्यास आणि किमान रक्कम जमा केली नसल्यास, तुमचे खाते गोठवले जाऊ शकते.
यानंतर, खाते अनफ्रीझ करण्यासाठी तुम्हाला 100 रुपये दंडाची रक्कम भरावी लागेल.
3. सुकन्या समृद्धी योजना (SSY)
सुकन्या समृद्धी खाते चालू ठेवण्यासाठी प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 250 रुपये जमा करणे आवश्यक आहे.
जर खात्यात किमान रक्कम जमा झाली नाही, तर खाते डीफॉल्ट खाते म्हणून मानले जाते.
डिफॉल्ट खाते हे खाते उघडल्याच्या तारखेपासून 15 वर्षांच्या आत नियमित केले जाऊ शकते.
मात्र, यासाठी किमान रकमेसह दरवर्षी 50 रुपये दंड भरावा लागणार आहे.
Web Title :- Tax And Investment Related Work Before 31 March | tax and investment related work before 31 march public provident fund sukanya samriddhi yojana national pension scheme
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update