Tax on Gold Investment | सोन्यात गुंतवणूक केल्यास कोण-कोणते टॅक्स द्यावे लागतात?, गुंतवणुकीचे प्रकार किती?; जाणून घ्या

नवी दिल्ली : Tax on Gold Investment | जगभरात गुंतवणुकदारांसाठी सोन्यात गुंतवणुक एक खुपच लोकप्रिय पर्याय आहे. अनेक गुंतवणुकदार स्टेबल रिटर्नसाठी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यावर विश्वास ठेवतात. शेयर बाजारात वाढत्या अनिश्चिततेसह, सोन्यात गुंतवणुकीकडे गुंतवणुकदारांचा (Tax on Gold Investment) जास्त कल आहे, ज्यामधून रिटर्न उत्पन्न मिळते.

सोन्यात गुंतवणुकीचे प्रकार

– फिजिकल गोल्ड : सोन्याचे दागिने, नाणी, बार इत्यादी

– डिजिटल गोल्ड : पेटीएम, गुगल पे सारख्या मोबाइल वॉलेटद्वारे सोने

– पेपर गोल्ड : गोल्ड बाँड, गोल्ड ईटीएफ, गोल्ड म्युच्युअल फंड इत्यादी

– डेरिव्हेटिव्ह करार कमोडिटी बाजाराच्या माध्यमातून सोने खरेदी

असे लागतात सोन्यावर कर

– फिजिकल गोल्ड

फिजिकल गोल्ड जसे की दागिने किंवा नाण्यांवरील कर यावर अवलंबून असतो की ते तुम्ही तुमच्याकडे किती काळ ठेवता. मोठ्या कालावधीसाठी आणि छोट्या कालावधीसाठी गुंतवणुकीच्या आधारावर टॅक्स लावला जातो.

जर तुम्ही खरेदी केल्यानंतर 3 वर्षाच्या आत सोने विकले, तर तुमच्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागेल. तर 3 वर्षानंतर ते ठेवले आणि नंतर विकले तर लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागेल. शॉर्ट टर्मसाठी भांडवली नफा एकुण टॅक्स योग्य उत्पन्नात जोडला जाईल आणि प्राप्तीकर स्लॅबदराने टॅक्स लावला जाईल.

मोठ्या कालावधीसाठी भांडवली नफ्यावर 20 % टॅक्स आणि 4 टक्के सेस आणि लागू असल्या अ‍ॅडिशनल सरचार्ज लावला जाईल. सोबतच फिजिकल गोल्डच्या खरेदीवर 3 टक्के जीएसटी आणि ज्वेलरीच्या बाबतीत मेकिंग चार्ज द्यावा लागेल. फिजिकल गोल्ड विकताना, टीडीएस लागू होणार नाही. परंतु जर तुम्ही 2 लाख रुपयांपेक्षा जास्तीचे सोन्याचे दागिने रोख खरेदी केले तर 1 टक्का टीडीएस लागू होतो.

– डिजिटल गोल्ड

डिजिटल गोल्डवर सुद्धा फिजिकल गोल्डप्रमाणे टॅक्स लावला जातो आणि तो गुंतवणुकीच्या कालावधीवर अवलंबून आहे. लाँग टर्म कॅपिटल गेन्स 3 वर्षानंतर 20 टक्के प्लस सेस आणि सरचार्जच्या दराने सोने विकण्यावर लागू होतो. मात्र, 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी ठेवलेल्या डिजिटल गोल्डवर रिटर्नवर थेट टॅक्स लागत नाही.

– पेपर गोल्ड

पेपर गोल्ड, ज्यामध्ये गोल्ड ईटीएफ, गोल्ड म्युच्युअल फंड आणि सॉवरेन गोल्ड बाँड (एसजीबी) चा समावेश आहे, हे ते सोने आहे जे कागदावर किंवा फिजिकल प्रकारे ठेवले जाते. यामध्ये गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड म्युच्युअल फंडवर फिजिकल गोल्डप्रमाणेच टॅक्स लागतो.

मात्र एसजीबीवर टॅक्स थोडा वेगळा आहे. गोल्ड ईटीएफ आणि म्युच्युअल फंडसाठी, एलटीसीजी 3 वर्ष ते जास्त कालावधीसाठी ठेवल्यास लागू होतो. दर सुद्धा तोच – 20 टक्के प्लस 4 टक्के सेस आणि 3 वर्षापेक्षा कमीच्या गुंतवणुकीसाठी, लाभ तुमच्या टॅक्सेबल इन्कममध्ये जोडले जाते आणि आयटी स्लॅबनुसार टॅक्स लावला जातो.

– सॉवरेन गोल्ड बाँड

एक सॉवरेन गोल्ड बाँडमधून 2.5 टक्के प्रति वर्ष व्याज प्राप्त होते, जे तुमच्या करप्राप्त उत्पन्नात जोडले जाते आणि तुमच्या स्लॅबनुसार चार्ज केले जाते. मात्र, 8 वर्षानंतर एसजीबीद्वारे तुम्ही जो नफा कमावता, तो टॅक्स फ्री असतो.

SGB मध्ये 5 वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो. मात्र, वेळेपूर्वी पैसे काढल्यास वेगवेगळे कर दर लागू होतात. 5 वर्षानंतर 8 वर्षापूवी पैसे काढल्याच्या प्रकरणात, LTCG टॅक्स 20 टक्के प्लस 4 टक्के सेस लागतो. (Tax on Gold Investment)

Police Raid | खंडणी वसुलीसाठी पोलिसांची छापेमारी ! 3 तरुणांना बेदम मारहाण एकाचा मृत्यू; 6 पोलीस निलंबित

– गोल्ड डेरिव्हेटिव्ज

गोल्ड डेरिव्हेटिव्हमधून रिटर्न केवळ व्यापार्‍यांसाठी उपलब्ध आहे. त्यांच्यावर खुप वेगळ्या प्रकारे टॅक्स लावला जातो.
जर फर्मची एकुण उलाढाल 2 कोटी रूपयांपेक्षा कमी असेल तर गोल्ड डेरिव्हेटिव्जमधून रिटर्नवर व्यावसायिकांना उत्पन्नाच्या रूपात दावा करता येऊ शकतो आणि 6 टक्केच्या दराने कर लावला जाऊ शकतो.
यातून अशा फर्मसाठी करांचे ओझे कमी होते.
मात्र, जर टर्नओव्हर 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल तर तो व्यावसायिक उत्पन्नाप्रमाणे सहभागी करता येऊ शकत नाही.

– गिफ्टच्या रूपात सोने

जर सोने आई-वडील, भाऊ-बहिण किंवा मुलांकडून भेट म्हणून मिळाले, तर ते टॅक्स फ्री असते.
परंतु तुम्ही ते भेट म्हणून यांच्याशिवाय कुणाकडून घेतले, तर तुम्हाला तुमच्या आयटी स्लॅबनुसार कर भरावा लागेल.
कुणाकडूनही 50,000 रुपयांपेक्षा कमी सोने भेट घेणे टॅक्स फ्री आहे.
मात्र, सोने विकल्यास फिजिकल गोल्डप्रमाणे टॅक्स लागतो. (Tax on Gold Investment)

हे देखील वाचा

Mahindra Centuro खरेदी करा 24 हजारात, 85 kmpl च्या मायलेजसह मिळेल 12 महिन्यांची वॉरंटी;

Tuljapur News | तुळजापूर यात्रा रद्द, मात्र दर्शनास ‘मुभा’ !

Bank Holidays In October | ऑक्टोबरमध्ये 21 दिवस बंद राहतील बँका, जाणून घ्या कोणत्या राज्यात केव्हा-केव्हा बंद आहेत बँका, येथे पहा पूर्ण List

 

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Tax on Gold Investment | how many tax form on gold investment know here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update