सावधान ! 8 ऑक्टोबरपासून बदलणार इनकम टॅक्स फायलिंगचे नियम, CBDT नं दिली माहिती, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुढील महिन्यांपासून इनकम टॅक्स असेसमेंट सुरु होणार आहे, याआधी केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड म्हणजेच CBDT ने सांगितले की जर एखाद्या करदात्याकडे पॅन कार्ड किंवा ई फायलिंग अकाऊंट नसेल तर त्यांना ई-असेसमेंटची सुविधा मिळणार नाही. CBDT ने सांगितले की 8 ऑक्टोबरपासून सुरु होणारी ई – असेसमेंट प्रक्रियेमध्ये त्या करदात्यांना सहभागी करुन घेणार नाही ज्यांच्यावर छापे पडले आणि त्याचे प्रकरण असाधारण परिस्थितीअंतर्गत येत असेल. सीबीडीटीने या संबंधित माहिती दिली.
आयकर विभागाच्या मते नव्या सिस्टिम अंतर्गत ते लोक सहभागी होणार नाही ज्यांनी पेपर मोडमध्ये ITR फाइल केला आहे आणि त्यांच्याकडे ई – फायलिंग अकाऊंट नाही. याशिवाय ज्यांच्याकडे पॅनकार्ड नाही त्यांना देखील या सिस्टिममध्ये सहभागी करुन घेण्यात येणार नाही. यात ते प्रकरण देखील सहभागी नाहीत ज्यांच्यावर काही कारणाने छापे पडले आहेत.
CBDT ने सांगितले की जे ई – असेसमेंट सिस्टिम अंतर्गत येतात त्यांना आपला रिस्पॉन्स द्यावा लागेल, कोणतीही नोटीस पाठवल्यास पुरावा दयावा लागेल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून असेसिंग अधिकाऱ्याला उत्तर द्यावे लागेल.
DIN आहे आवश्यक –
सीबीडीटीने सांगितले की, ई प्रक्रियेसाठी कोणतीही माहिती देताना पहिल्यांदा सावध राहून चेक करायला हवे. यात सांगण्यात आले की ई असेसमेंट सर्व कम्युनिकेशन आणि नोटीसमध्ये डॉक्यूमेंट आयडेंटिफिकेशन नंबर (DIN) असेल. नुकतेच सिस्टिमची पारदर्शकता वाढवण्यासाठी डीआयएन नंबर लागू करण्यात आला आहे.
नियमांचे उल्लंघन करण्याऱ्यावर कारवाई –
यात सांगण्यात आले की ई असेसमेंटमध्ये काही प्रकरणात करदात्यांची वैयक्तिक सुनावणी आणि उपस्थिती आवश्यक आहे. हे त्या प्रकरणी असेल ज्यात स्पष्ट होईल की करदात्यांने माहिती देताना आयकर कायद्याचे उल्लघंन केले असेल.नुकतेच दिल्लीत नॅशनल ई असेसमेंट सेंटर सुरु केले आहे. या सेंटरवरुन करदात्यांना नोटीस पाठवण्यात येईल. आणि 15 दिवसात रिस्पॉन्स न मिळाल्यास येथूनच असेसिंग अधिकारी केस दाखल करेल.
- Visit : policenama.com
लाल मिरची खाल्ल्याने वाढते आयुष्यमान ! संशोधकांचा दावा
तुम्हाला माहिती आहेत का कांद्याचे ‘हे’ ६ आश्चर्यचकित फायदे, जाणून घ्या
ग्रीन कॉफी’ मुळे बरा होऊ शकतो मधुमेह, ‘हे’ आहेत आश्चर्यकारक फायदे
पुरूषांना ‘या’ समस्या ठरू शकतात त्रासदायक, करा ‘हे’ रामबाण उपाय
तुम्हाला घोरण्याची सवय आहे का? मग घरच्याघरीच करा ‘हा’ खास उपाय
मेंदूची क्षमता वाढण्यासाठी ‘हे’ आहे रामबाण औषध, स्वयंपाक घरातच उपलब्ध