कोरोना उपचार किंवा मृत्यूनंतर वारसांना मिळालेल्या मदतीच्या रक्कमेवर लागणार नाही टॅक्स

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना उपचारा (Corona Treatment) वर होणारा खर्च किंवा मृत्यू (Death) च्या बाबतीत अवलंबिताना मिळणार्‍या रक्कमेवर प्राप्तीकर (Income Tax) लागणार नाही. प्राप्तीकर विभागा (Income Tax Department) नुसार, कोरोनाच्या उपचारा (Treatment) साठी अनेक करदात्यांनी आपल्या कंपन्या किंवा इतरांकडून जी मदत घेतली, ती प्राप्तीकर कक्षेच्या बाहेर ठेवली जाईल. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये किंवा या वर्षी कोरोना ( Corona) उपचारावर खर्चासाठी घेतलेली मदत प्राप्तकरातून मुक्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

कोरोनामुळे मृत्यूच्या प्रकरणात मृताची कंपनी किंवा आप्तांकडून मिळालेल्या मदतीच्या रक्कमेवर सुद्धा ठराविक मर्यादेपर्यंत प्राप्तीकर लागणार नाही. कंपन्यांसाठी याबाबतीत आपल्या मृत कर्मचार्‍यांना देण्यात आलेल्या मदतीची कोणतीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही.

आप्त किंवा इतरांकडून अवलंबिताना मिळालेली कमाल 10 लाख रुपयांपर्यंतची रक्कम आयकर कक्षेच्या बाहेर ठेवली आहे. कोरोना संकट पाहता प्राप्तीकर विभागाने अनेक कागदपत्र जमा करण्याची कालमर्यादा सुद्धा वाढवली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : tax will not be levied on the amount of help given to dependents after corona treatment or death

हे देखील वाचा

Pune Unlock | पुणे महापालिकेकडून नवीन नियमावली जाहीर ! सोमवारपासून सर्व दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंतच, जाणून घ्या काय सुरू आणि काय बंद

Natural Gas Price | 1 ऑक्टोबरला ठरणार घरगुती गॅसच्या नवीन किंमती; दर 60 टक्केपर्यंत वाढण्याची शक्यता : ONGC

Burglary in Pune | नर्‍हे परिसरातील गोडाऊन फोडून 62 लाखाचा माल लंपास, सिंहगड रोड पोलिसांकडून एकाला अटक