पार्टी करून ‘कॅब’नं जात होती महिला, चालकानं फ्लॅटमध्ये घुसून केला ‘बलात्कार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ब्रिटनमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका पार्टीतून टॅक्सीने घरी परतणार्‍या महिलेवर टॅक्सी चालकाने बलात्कार केला आहे. टॅक्सीचालकाने जबरदस्तीने तिच्या घरात घुसत तिच्यावर बलात्कार केला.

मिळालेल्या माहितीनुसार, ३१ वर्षीय महिला पार्टीत गेली होती, त्यादरम्यान, तिने जास्त मद्यपान केल्याने तिच्या मित्रांनी तिला टॅक्सी बुक करून दिली. पोलिसांनी सांगितले की, जेव्हा महिला पार्टीमधून टॅक्सीद्वारे तिच्या फ्लॅटवर येत होती, तेव्हा ड्रायव्हरने तिचा पाठलाग केला. त्यानंतर त्याने जबरदस्तीने त्या महिलेच्या घरात प्रवेश करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

दरम्यान, विशेष अधिकारी पीडितेला मदत करीत असून पोलिस या प्रकरणाशी संबंधित पुरावे गोळा करीत आहेत. याप्रकरणी एका 37 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. बलात्काराच्या घटनेच्या सुमारे 10 दिवसानंतर पोलिसांना आरोपीला अटक करण्यात यश आले. आरोपीला सध्या पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/