खा. सुप्रिया सुळेंशी गैरवर्तन करणारा टॅक्सी चालक ‘गोत्यात’, पोलिसांकडून अटक

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना काल एका मुजोर टॅक्सी चालकाच्या अरेरावीला सामोरे जावे लागले. सुळे या काल देवगिरी एक्सप्रेसने प्रवास करत होत्या कुलजीतसिंह मल्होत्रा नावाचा टॅक्सी चालक प्रवाशांसोबत हुज्जत घालत होता. मल्होत्राने सुप्रिया सुळेंना गाठले आणि तो त्यांच्याशी हुज्जत घालू लागला. सुळे यांनी त्याला दोनदा नकार दिला. मात्र त्याने ऐकले नाही.

एवढेच नाही तर मल्होत्रा फोन काढून सुळे यांच्यासोबत सेल्फी काढू लागला. एवढेच नाही तर त्याने सुप्रिया सुळे यांना पुढे जाऊ न देता अडवून ठेवले. सुळे यांनी ताबडतोब ट्विट करत रेल्वे मंत्रालयाकडे याची तक्रार केली आणि याबाबत दखल घेण्याची विनंती केली.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ट्विटमध्ये –

आपल्यासोबत झालेल्या प्रकारावर सुप्रिया सुळे यांनी रेल्वे मंत्रालयाला ट्विट करत टॅक्सी चालकांना रेल्वे प्लॅटफॉर्म वर किंवा विमानतळाच्या आत न सोडण्याची मागणी केली आहे. तसेच अशा चालकांना केवळ टॅक्सी स्टॅन्डवरच थांबण्याची परवानगी द्यावी असेही सुळे यांनी म्हंटले आहे.

टॅक्सी चालकावर कारवाई करत भारतीय रेल्वे कायद्यांतर्गत दादर आरपीएफने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याची रवानगी आरपीएफ कोठडीत केली आहे. तसेच विना तिकीट प्लॅटफॉर्म वर आल्यामुळे २६० रुपये दंड आणि युनिफॉर्म व वाहन परवाना नसल्यामुळे चालकाला ६०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –