Coronavirus : ‘या’ मशिनव्दारे केली जाणार ‘कोरोना’ची तपासणी, तासाभरात मिळणार रिपोर्ट, जाणून घ्या कसं

गोरखपूर : वृत्तसंस्था – गोरखपूरच्या बीआरडी मेडिकल कॉलेजमधील टीबी मशीनने कोरोनाची चाचणी होणार आहे. आयसीएमआरची परवानगी मिळाल्यानंतर मंगळवारी सीबी नेट मशीनने कोरोनाच्या तपासणीची झालेली ट्रायल पूर्णपणे यशस्वी राहिली. मशीन दोन तासांत चार नमुन्यांची रिपोर्ट देते. दोन दिवसानंतर मायक्रोबायोलॉजी विभाग देखील या मशीनद्वारे तपासणी सुरू करेल.

गोरखपूर आणि बस्ती मंडळामध्ये मोठ्या संख्येने टीबी रुग्णांची तपासणी करण्यासाठी मेडिकल कॉलेजमध्ये सीबी नेट मशीन बसवण्यात आले आहे. हे मशीन टीबीचे सामान्य तसेच रजिस्टन्स बॅक्टेरिया ओळखते. म्हणूनच आयसीएमआरने कोरोना सॅम्पल तपासण्यासाठी तिला प्रभावी मानले आहे.

आयसीएमआरकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर विभागप्रमुख डॉ. अमरेश सिंह यांनी कंपनीकडून इंजिनियरला बोलावले आणि मशीनचे कॅलिब्रेट केले आणि दोन नमुन्यावर ट्रायल देखील झाली. यात एक कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाचा नमुना होता. ट्रायल पूर्णपणे यशस्वी झाली. आयसीएमआरला ट्रायलचा रिपोर्टही पाठवण्यात आला आहे.

दोन दिवसात सुरु होणार तपासणी
मायक्रोबायोलॉजीच्या विभागाचे प्रमुख डॉ. अमरेश सिंह म्हणाले की, ट्रायलचा रिपोर्ट आयसीएमआरला पाठवण्यात आला असून आयसीएमआर ही नवीन प्रयोगशाळा म्हणून नोंदणी करत आहे. नोंदणीनंतर आयडी व पासवर्ड मिळेल. यानंतर ऑनलाईन रिपोर्टिंग सुरू होईल. ऑनलाईन रिपोर्टिंगला मान्यता दिल्यानंतरच तपासणी सुरू केली जाईल. ही प्रक्रिया दोन दिवसात पूर्ण होईल.

आरएमआरसीचे संचालक डॉ. रजनीकांत म्हणाले की बीआरडी मेडिकल कॉलेजमधील सीबी नेट मशीनने कोरोनाची तपासणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मशीनमध्ये सॉफ्टवेअर स्थापित केले असून त्याला कॅलिब्रेट करण्याचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच लॅबला ऑनलाईन रिपोर्टिंगची परवानगी दिली जाईल.