मुंबईत टीबीच्या मृत्यू संख्येत घट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाई – गेल्या चार वर्षांमध्ये टीबीमुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत २४ टक्क्यांनी घट झाली आहे. २०१३ मध्ये मुंबई महापालिकेने मुंबई मिशन फॉर टीबी कंटड्ढोल हा उपक्रम सुरू केला होता. या योजनेद्वारे टीबी रुग्णांना सरकारी व खासगी रुग्णालयात उपचार मिळणं हा यामागील मुख्य उद्देश होता. त्यानुसार गेल्या पाच वर्षांत टीबी संदर्भात विविध योजना राबवण्यात आल्या. त्यानुसार आता टीबीमुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे.

२०१३ या वर्षांत टीबीमुळे ७,३९१ रुग्णांचा मृत्यू झाला. या संख्येत घट होऊन २०१६ मध्ये ५,६३४ जणांचा मृत्यू झालाय. यावरून २०१३-१६ या चार वर्षांत टीबीमुळे होणाऱ्या मृत्यूच्या आकडेवारीत २४ टक्क्यांनी घट झाली आहे. २०१९-२०२५ या भारत सरकारच्या टीबीमुक्त भारत घोषणेच्या धर्तीवर कृती आराखडा टीबीमुक्त मुंबई योजना तयार करण्यात येत आहे. याद्वारे रोगप्रतिबंध आणि रुग्णांचा शोध घेणं यावर भर दिला जाईल.

२०१७ या वर्षांत सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयात उपचारांसाठी आलेल्या ४५,६७५ टीबी रुग्णांची नोंद आहे. तर २०१८ मध्ये विविध रुग्णालयांत ४६,५१३ रुग्णांची नोंद आहे. तर कुठल्याही औषधांना दाद न देणारा टीबी आहे का हे पाहण्यासाठी गेल्या दोन वर्षांत जीर्न एक्सपेट चाचणी करण्यात आलीये. यात २०१७ मध्ये ६७० रुग्णांना एमडीआर तर २०१८ मध्ये ५४५ रुग्ण एमडीआर टीबीचे आढळून.

टीबी रुग्णांवर तातडीने निदान व उपचार व्हावे यासाठी महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आलाय. यासाठी रुग्णालयात छातीविकार तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आलीये. खासगी रुग्णालयातील हे डॉक्टर पालिका रुग्णालयात पार्ट-टाईम काम करतात. दुपारी १२ ते ४ या वाजेपर्यंत हा बाह्यरुग्ण विभाग सुरू असतो.