TCS | भारती एयरटेल आणि TCS ची 5G नेटवर्क बनवण्यासाठी पार्टनरशिप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (policenama online) – टेलीकॉम कंपनी भारती एयरटेल (bharti airtel) आणि देशाची सर्वात मोठी सॉफ्टवेयर कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) tata consultancy services ने देशात 5G नेटवर्क सोल्यूशन्ससाठी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप (Strategic Partnership) केली आहे. एयरटेल 5जी नेटवर्क लाँच करण्यासाठी टीसीएसच्या (TCS) सोल्यूशन्सची पुढील वर्षी जानेवारीपासून ट्रायल सुरू करेल. ही ट्रायल केंद्र सरकारकडून central government जारी गाईडलाईन्सनुसार केली जाईल. TCS | Bharti Airtel and TCS join hands to build a 5G network in the country

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

टाटा ग्रुपने O-RAN बेस्ड रेडियो आणि NSA/SA कोअर डेव्हलप केले आहे. ज्यास पूर्णपणे देशात बनवलेल्या एका टेलीकॉम स्टॅकसोबत इंटीग्रेट केले आहे.

या पार्टनरशिपमध्ये टीसीएस आपल्या ग्लोबल सिस्टम इंटीग्रेशन एक्सपर्टटाईजसोबत 3GPP आणि O-RAN दोन्ही स्टँडर्डसाठी एंड-टु-एंड सोल्यूशन तयार करण्यात मदत करेल.

भारती एयरटेलचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO (भारत आणि साऊथ आशिया), गोपाळ विट्ठल यांनी म्हटले, टाटा ग्रुप (Tata Group) सोबत पार्टनरशिप केल्याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही देशाला 5जी आणि याच्याशी संबंधीत टेक्नोलॉजीसाठी ग्लोबल हब बनवणार आहोत. यामुळे देशात इनोव्हेशन आणि मॅन्युफॅक्चरिंग डेस्टिनेशन बनवण्यात सुद्धा मदत होईल.

टीसीएसचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, एन. गणपती सुब्रमणियम (N. Ganapati Subramaniam) यांनी म्हटले, आम्ही 5जी आणि याच्या संबंधीत शक्यतांबाबत उत्साहित आहोत. आम्ही एक वर्ल्ड क्लास नेटवर्किंग इक्विपमेंट आणि सोल्यूशन्स बिझनेस तयार करत आहोत.

या वर्षाच्या सुरुवातीला एयरटेल लाइव्ह नेटवर्कवर 5जी चे सादरीकरण करणारी देशाची पहिली टेलीकॉम कंपनी बनली होती. कंपनीने टेलीकॉम डिपार्टमेंटकडून अ‍ॅलोकेट करण्यात आलेल्या स्पेक्ट्रमच्या वापराने मोठ्या शहरात 5जीची ट्रायल सुरू केली आहे.

Web Title :- TCS | Bharti Airtel and TCS join hands to build a 5G network in the country

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

तुमच्या Aadhaar Card वर जेंडर चुकीचे आहे का? UIDAI ने जारी केली लिंक; आता घरबसल्या अपडेट करा ‘या’ सोप्या पध्दतीनं, जाणून घ्या

e commerce | तुम्ही करत असाल Online Shopping! तर जाणून घ्या नवीन नियमांबाबत; आता Flash Sale च्या नावावर होणार नाही फसवणूक, जाणून घ्या

रश्मी शुक्ला यांच्यासह एका पोलिस अधीक्षकांवर गंभीर आरोप; पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी