TCS चे संस्थापक FC कोहली यांचं वयाच्या 96 व्या वर्षी ‘निधन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –    देशातील सर्वात मोठी आयटी सेवा कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (Tata Consultancy Services) चे संस्थापक आणि पहिले सीईओ एफसी कोहली (Faqir Chand Kohli) यांचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले. त्यांना भारतीय आयटी उद्योगाचे जनक देखील म्हटले जाते.

एक हुशार तंत्रज्ञ म्हणून ओळखले जाणारे कोहली 1991 मध्ये टाटा-आयबीएमचा भाग म्हणून आयबीएमला भारतात आणण्याच्या निर्णयामध्ये सक्रिय सहभाग घेत होते. हे हार्डवेअर मॅन्युफॅक्चरिंगच्या संयुक्त उद्यमातील भाग होते. सॉफ्टवेअर उद्योगाचे जनक म्हणून ओळखले जाणारे एफसी कोहली यांनी भारताच्या तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व केले आणि टीसीएसचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून देशाला 100 बिलियन डॉलर्सचा आयटी उद्योग तयार करण्यास मदत केली.

प्रौढ साक्षरता कार्यक्रमावर केले काम

कोहलीने प्रौढ साक्षरता कार्यक्रमात काम केले. ज्या लोकांना कधी शिक्षित केले नव्हते, त्यांना शिकवले. 1951 मध्ये कोहली टाटा इलेक्ट्रिक कंपनीत रुजू झाले आणि सिस्टम ऑपरेशन व्यवस्थापित करण्यासाठी लोड डिस्पॅचिंग सिस्टम स्थापित करण्यास मदत केली. त्यानंतर 1970 मध्ये ते कंपनीचे संचालक बनले आणि नंतर टीसीएसचे पहिले सीईओ म्हणून त्यांची नेमणूक झाली. 1999 मध्ये ते वयाच्या 75 व्या वर्षी निवृत्त झाले.