मुंबई : TCS | शेयर बाजारात (stock market) मागील दोन दिवसांपासून सतत घसरण होत आहे आणि गुंतवणुकदारांचे 6 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे बुडाले आहेत. तर देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी (Tata Consultancy) च्या शेयर (Shares) मध्ये सुद्धा मागील 7 व्यावसायिक दिवसात सुमारे 400 अंकाची घसरण दिसून आली (TCS) आहे.
ही घसरण 8 ऑक्टोबरनंतर सतत सुरू आहे. याच दिवशी कंपनीचा शेयर 3990 रुपयांच्या लाइफ टाइम आकड्यावर पोहचला होता. तेव्हापासून आतापर्यंत कंपनीचे मार्केट कॅप (market cap) 1.41 लाख कोटी रुपयांपेक्षा कमी झाले आहे. तर गुंतवणुकदारांना सुमारे 10 टक्के नुकसान झाले आहे. (TCS)
लाईफ टाइम हायपासून किती कमी झाला कंपनीचा शेयर
8 ऑक्टोबरला टीसीएसचा शेयर 3990 रुपयांसह लाईफ टाइम हायवर पोहचला होता. त्यावेळी असे वाटत होते की, कंपनीचा शेयर 4000 रुपयांची लेव्हल सहज पार करेल. परंतु पुढील दिवशीच कंपनीच्या शेयरमध्ये नफा वसूली दिसून येऊ लागली. जी अजून सुरू आहे.
कंपनीच्या शेयरचा दर 3607.85 रुपयांवर बंद झाला आहे. याचा अर्थ 7 व्यावसायिक दिवसात कंपनीचा शेयर सुमारे 10 टक्केपर्यंत खाली आला आहे.
Product Data Analysts | कोणत्याही पदवीशिवाय मिळवू शकता 61 लाख रुपयांची नोकरी, केवळ करावे लागेल ‘हे’ काम; जाणून घ्या
मार्केटमध्ये मोठी घसरण
तर दुसरीकडे कंपनीच्या शेयरमध्ये घसरण आल्याने मार्केट कॅपमध्ये सुद्धा मोठी घसरण पहायला मिळाली आहे. 3990 रुपयांसह कंपनीचे मार्केट कॅप 14.75 लाख कोटी रुपये होते. जे बाजार बंद झाल्यानंतर कंपनीचे मार्केट कॅप 13.34 लाख कोटी रुपयांवर आले आहे. याचा अर्थ हा आहे की तेव्हापासून आतापर्यंत कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 1.41 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.
गुंतवणुकदार सुद्धा झाले हैराण
तर दुसरीकडे गुंतवणुकदार सुद्धा या घसरणीने खुप त्रस्त झाले आहेत.
कंपनीचा शेयर लाईफ टाइम हायपासून 382.15 रुपये खाली आहे.
याचा अर्थ आहे की आता कुणाकडे कंपनीचे एक हजार शेयर आहेत तर त्याचे 3.82 लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.
जर कुणाकडे 100 शेयर असतील तर 38215 रुपयांचे नुकसान झाले असेल.
एका दिवसात कंपनीच्या शेयरमध्ये 0.74 टक्के म्हणजे 26.75 रुपयांची घसरण दिसून आली आहे. (TCS)
Gold Silver Price Today | सोन्याच्या किंमतीत पुन्हा ‘घट’ तर चांदीच्या दरात ‘वाढ’; जाणून घ्या