TCS कंपनीकडून पुन्हा एकदा वेतन वाढीची घोषणा; 4.7 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतातील सर्वात मोठी असलेली माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रातील कंपनी म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) तर या कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. पुर्वीप्रमाणे आताही या कंपनीने आणखी एकदा आपल्या कर्मचाऱ्यांच्या हाती एक खूशखबर दिली आहे. तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीने आपल्या आगामी २०२१-२२ या वर्षांसाठी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याची घोषणा केली आहे.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही यासंदर्भात निर्णय घेणारी देशातील पहिली IT कंपनी आहे. कंपनीच्या या निर्णयाचा लाभ कंपनीतील तब्बल ४.७ लाख कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. तर कंपनीच्या ऑफशोअर कर्मचाऱ्यांच्या वेतनात ६ ते ७ टक्के वेतनवाढ होऊ शकते. कंपनीनं सहा महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा निर्णय घेतला आहे. तसेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या प्रवक्त्यांनीदेखील कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तर या कंपनीच्या बेंचमार्कनुसार २०२१-२२ या वर्षात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनी जगातील सर्व कर्मचाऱ्यांना या वेतनवाढीचा लाभ मिळणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, २०२१-२२ या वर्षांमध्ये वेतन वाढीच्या कालावधीपासून ६ महिन्यांच्या कालावधीत कर्मचाऱ्यांना एकूण १२ ते १४ टक्क्यांच्या आसपास वेतनवाढ मिळेल असे समजते. तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात आपल्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ करण्याचा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळीही कर्मचाऱ्यांची वेतनवाढ करणारी ती पहिली आयटी कंपनी ठरली होती. कोरोनाच्या परिस्थितीत अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरही कंपनीने आपल्या नियमांनुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्यात आली होती.

तसेच, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांची योग्य वेळी बढतीही करत असते, या कंपनीच्या वेतनवाढीच्या निर्णयानं कंपनीने सामान्य वाढीचे चक्राचे (Normal incremental cycle) संकेत दिल्याचंही तज्ज्ञांचं मत आहे. या चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत TCS ने अपेक्षेपेक्षा चांगलं कार्य केलं आहे. कंपनीची महसूल वाढही मागील ९ वर्षांत अधिक राहिला आहे. या चालू आर्थिक वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत सतत चलनाच्या टर्ममध्ये कंपनीची महसूल वाढ तिमाही आधारावर ४.१ टक्के एवढी आहे. याचप्रमाणे यापूर्वी आणखी एका IT कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ नाही परंतु बोनस देण्याची घोषणा केली होती. IT कंपनी अ‍ॅक्सेंचरनं आपल्या कर्मचाऱ्यांना एका आठवड्याच्या वेतनाच्या मूळ वेतनाएवढे बोनस देण्याची घोषणाही करण्यात आली होती.