TCS Share Price | टीसीएसच्या शेयरमधून तुम्ही करू शकता 30% कमाई, निकालानंतर काय म्हणत आहेत एक्सपर्ट

नवी दिल्ली : वृत्त संस्था – TCS Share Price | देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी ‘टीसीएस’च्या डिसेंबर 2021 च्या तिमाही निकालांच्या घोषणेनंतर, 13 जानेवारी रोजी तिचे शेअर्स दोन टक्क्यांहून अधिक मजबूत झाले आहेत. त्याची किंमत बीएसईवर 3944.40 रुपयांवर पोहोचली, जी 3990 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या विक्रमी किंमतीच्या जवळपास आहे. डिसेंबर तिमाहीत TCS चा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक 12.36 टक्क्यांनी वाढून 9,769 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. (TCS Share Price)

 

File photo

 

टीसीएसमध्ये 30% तेजी

‘टीसीएस’ने देखील 7 रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला आहे आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस 4,500 रुपये प्रति शेअर दराने 18,000 कोटी रुपयांचे शेअर्स बायबॅक करणार आहे. ब्रोकरेज फर्मने गुंतवणूकदारांना टीसीएसचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काही दिवसांत टीसीएस शेयरच्या किमती 30 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

 

 

टीसीएस शेअरमधून रिटर्न (Returns from TCS shares)

अनेक ब्रोकरेज हाऊसनी टीसीएसच्या शेअर्स खरेदीचा सल्ला दिला आहे. विश्लेषकांना असे वाटते की सध्याच्या परिस्थितीत जिथे मागणीपेक्षा पुरवठा वाढ अधिक महत्त्वाची आहे, तिथे प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत तरुणांना गुंतवून ठेवण्याची टीसीएसची क्षमता कंपनीत आहे. आयटी कंपन्यांमध्ये टीसीएसचा एट्रिशन रेट (TCS Attrition Rate) सर्वात कमी आहे. (TCS Share Price)

 

 

टीसीएसचे नवीन क्लायंट

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (Tata Consultancy Services) म्हटले आहे की चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत त्यांचा ऑपरेटिंग नफा 25 टक्क्यांच्या जवळपास आहे. वार्षिक आधारावर तो 1.6 टक्क्यांनी घसरला आहे. प्रतिस्पर्धी सॉफ्टवेअर कंपन्यांबद्दल (Software Company) बोलायचे झाले तर या तिमाहीत त्यांचे मार्जिनही कमी झाले आहे.

गेल्या तिमाहीत, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने 10 नवीन क्लायंटकडून 100 दशलक्ष पेक्षा जास्त किमतीचे करार मिळवले आहेत. कंपनीकडे आता असे एकूण 58 ग्राहक आहेत. यासह, 50 दशलक्षपेक्षा जास्त करार असलेले 21 क्लायंट टीसीएसच्या कक्षेत आले आहेत. यामुळे अशा ग्राहकांची एकूण संख्या 118 वर पोहोचते.

टीसीएसचे मार्जिन चांगले असेल

प्रभूदास लिलाधर यांचे मत आहे की पुरवठा बाजूवरील खर्च आणि खर्चावरील परतावा यावर दबाव असूनही टीसीएस 2023 मध्ये 26 टक्के EBIT मार्जिन मिळवू शकते. पुरवठा बाजूच्या दबावामुळे, टीसीएसकडे उप-कंत्राटी खर्च, सुधारित किंमत, पिरॅमिड ऑप्टिमायझेशन, सर्वोत्तम श्रेणीतील सप्लाय साईड इंजिन आणि महसूल वाढ यातून फायदा घेऊन मार्जिन विस्ताराची चांगली क्षमता आहे.

 

 

टीसीएसच्या वाढीवर विश्वास

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचा विश्वास आहे की टीसीएस कंपनीची वाढ पुढील काळात चांगली होणार आहे. टीसीएसची रणनीती छोट्या डीलद्वारे मार्केट शेअर वाढवणे आहे. टीसीएसच्या आकारमानावर, कार्यक्षम क्षमता आणि पोर्टफोलिओच्या विस्तारावर आधारित, जायंट आयटी उद्योगाच्या वाढीचा फायदा घेण्यासाठी योग्य स्थितीत आहे.

टीसीएसवर तज्ञांचे मत

कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने (Kotak Institutional Equities) टीसीएसचे बाय रेटिंग कायम ठेवले आहे.
रिसर्च फर्मचा असा विश्वास आहे की टीसीएस प्रतिस्पर्ध्यांपेक्षा मार्जिन-संबंधित आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिक चांगल्या स्थितीत आहे.
कारण ते आपल्या ग्राहकांच्या डिजिटल परिवर्तनामध्ये अधिकाधिक यशस्वी होत आहेत. टीसीएसकडे पुरवठ्याचे व्यवस्थापन उत्तम आहे.
कोटकने 2022-24 या आर्थिक वर्षासाठी टीसीएसचा महसूल आणि प्रति शेअर कमाई अंदाज 1-3 टक्क्यांनी वाढवला आहे.

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे.
येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

Web Title : TCS Share Price | tcs share price jumps 2 on strong q3fy22 revenue growth may rally up to 30 buy tcs stocks

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Income Tax Return | IT रिटर्न भरण्याची डेडलाइन आता 15 मार्च

Pune Corporation | समाविष्ट 23 गावांतील ‘त्या’ सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांचीच अन्यथा…

AICTS Pune Recruitment 2022 | 3 री उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी ! पुण्यातील सरकारी इन्स्टिटयूटमध्ये भरती; जाणून घ्या

Supreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे, ‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

TET Exam Scam | अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा ! अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये; सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश

Anti Corruption Bureau Pune | 10 हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात