पदवीधरांसाठी खुशखबर ! जगातील मोठी IT कंपनी देणार 44 हजार उमेदवारांना नोकर्‍या, लवकरच ‘हायरिंग’ सुरू

नवी दिल्ली : कोरोना काळ आणि लॉकडाऊनमुळे बहुतांश कंपन्यांनी कामगार कपात तसेच पगार कपात सुरू केली आहे. अशावेळी टीसीएस बेरोजगार युवकांसाठी खुशखबरी घेऊन आली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस द्वारे जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात 44 हजार ग्रॅजुएट फ्रेशर्सना नोकरीवर घेण्याची घोषणा केली आहे. यासाठी कंपनी लवकरच सुरूवात करणार आहे.

टीसीएस ईव्हीपी आणि ग्लोबल हेड ह्यूमन रिसोर्सेस मिलिंद लक्कड यांच्यानुसार, कंपनी लवकरच फ्रेशर्स युवकांशी संपर्क साधणार आहे. कोरोनामुळे शैक्षिक वर्षात उशीर झाल्याने अजूनपर्यंत त्यांचे जॉयनिंग झालेले नाही. टीसीएसचे सीईओ राजेश गोपीनाथन यांनी सांगितले की, टीसीएस सध्या लेटरल हायरिंग सुरू करणार आहे. परंतु, सध्या हे स्पष्ट नाही की, हायरिंग कोणत्या क्षेत्रात होईल.

टीसीएसमध्ये प्रत्येक वर्षी मार्चमध्ये होते हायरिंग
टीसीएस दरवर्षी मार्चमध्ये हायरिंग करते, परंतु यावेळेस कोरोना काळ सुरू असल्याने मार्चमध्ये लेटरल हायरिंग फ्रीज केले होते. जे कंपनी जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात सुरू करू शकते. सोबतच अमेरिकासह दुसर्‍या देशांत नवीन भरती केली जाईल. परंतु कोविडमुळे ही भरती कमी प्रमाणात होईल.

मनीकंट्रोलसोबत नुकत्याच झालेल्या चर्चेदरम्यान कंपनीचे सीएफओ वी-रामकृष्णन यांनी म्हटले की, कंपनीसाठी सर्वात वाईट काळ आता गेलेला आहे आणि आता रिकव्हरीचे संकेत दिसत आहेत. अशाप्रकारे कंपनीचे सीईओ राजेश गोपीनाथन यांनी सुद्ध म्हटले की, पुढे कंपनीला चांगल्या शक्यता दिसत आहेत. तिसर्‍या तिमाहीपासून शानदार रिकव्हरी दिसून येईल.

नव्या टेक्नॉलॉजीवर काम करत आहे कंपनी
बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस, इन्श्युरन्स (बीएफएसआय), मॅन्युफॅक्चरिंग आणि रिटेलसारखी तमाम सेक्टर कोविडनंतर न्यू नॉर्मल स्वीकारत आहे आणि यासोबतच नव्या टेक्नॉलॉजीला आपल्या व्यवसायात महत्व देत आहे. त्यांनी पुढे म्हटले की, बँकिंग सेक्टरमध्ये कॉन्टेक्ट लेस बँकिंग आणि रिटेल सेक्टरमध्ये टचलेस डिलिव्हरी सारख्या तंत्रज्ञानाला महत्व आले आहे. अशाप्रकारे सप्लाय चैन मॅनेज करणार्‍या कंपन्यासुद्धा नव्या तंत्रज्ञानावर फोकस करत आहेत.

त्यांनी सांगितले की, कोविड संकट असूनही जून 2020 मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीला 6.9 अरब डॉलरची ऑर्डर मिळाली. यापैकी, 2.3 बिलियन डॉलरच्या ऑर्डर बीएफएसआय आणि मोठ्या मॅन्यूफॅक्चरिंग सेक्टरशी संबंधित होत्या. हे कंपनीसाठी चांगले संकेत आहेत. क्लाऊड मायग्रेशन, डेटा अ‍ॅनालिटिक आणि टीसीएसचे स्वताचे प्रॉडक्ट आणि प्लॅटफॉर्म जसे की इग्नीओसाठी मोठी मागणी दिसून येत आहे. याशिवाय कंपन्या सायबर सिक्युरिटीवर सुद्धा मोठा खर्च करत आहेत. यातून कंपनीला निश्चित पुढे मोठा फायदा होईल.