चंद्राबाबू नायडूंनी आंध्रप्रदेश सरकार विरोधात केलं ‘आनोखं’ आंदोलन, केला ‘हल्लाबोल’ (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तेलगू देशम पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी सोमवारी अमरावतीमध्ये एका वेगळ्या प्रकारे राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन पुकारले. चंद्राबाबू नायडूंनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसह अमरावतीमध्ये विरोध प्रदर्शन केले. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर आरोप लावला की जगनमोहन रेड्डी राज्याला विकासापासून मागे ढकलत आहे.

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी पुन्हा एकदा वायएसआर काँग्रेस आणि मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर हल्लाबोल केला. चंद्राबाबूंनी आरोप केला की वायएसआर सरकार जनविरोधी धोरणं लागू करत आहे. ते म्हणाले की, सरकार राज्याच्या विकास कार्यात रोख आणून राज्याचा विकास अडवून ठेवत आहे. या दरम्यान त्यांनी उलट चालून एका आनोख्या प्रकारे विरोध केला. ते म्हणाले की राज्य मागील बाजूस ढकलले जात आहे. राज्य सरकारकडे पुढील पाऊल टाकण्याचा कोणताही मानस दिसत नाही.

आंध्रप्रदेशच्या राजधानी अमरावतीमध्ये नागरिक प्रशासनाने कृष्णा नदीच्या तटावर तयार करण्यात आलेल्या अनाधिकृत निर्माणाला उध्वस्त करण्याची कारवाई केली. या कारवाईमध्ये निश्चित मानले जात आहे की आता माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्या निवासस्थानावर हातोडा चालवण्यात येईल. या आधी आंध्र प्रदेश कॅपिटल रीजन डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी वंदावल्ली गावात नायडू निवासस्थानाजवळ असलेल्या एका टीडीपी नेत्यांच्या अनाधिकृत निर्माण निवासस्थानावर हातोडा चालवला होता.

सत्तेत आहे वायएसआर काँग्रेस –
जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाने विधानसभा निवडणूकीत 175 पैकी 151 जागांवर विजय मिळवला. जर चंद्राबाबू नायजू यांच्या टीडीपीने 102 मधील 23 जागा मिळवल्या. वायएसआर काँग्रेसने 49.9 टक्के मत मिळवली तर टीडीपीला 39.2 टक्के मतं मिळाली. जगनमोहन रेड्डींनी 2009 मध्ये राजकारणाला सुरुवात केली. त्याचवर्षी त्यांचे वडील अविभाजित आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री झाले. याआधी त्यांच्या सरकारला सोनिया गांधींच्या नेतृत्वातील काँग्रेसपक्षाचा पाठिंबा होता. परंतू 2010 मध्ये जगन यांनी आपली आई वायएस विजयम्मा यांच्याबरोबर मिळून काँग्रेसशी हात झटकले आणि आपला दुसरा पक्ष उभा केला.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/