निवडणूक प्रचारासाठी चित्तूरला जात असता माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांना तिरुपती विमान तळावर ताब्यात घेण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार नायडू चित्तूर जिल्ह्यात निवडणूक प्रचारासाठी जात होते. यासाठी ते विमानतळावर पोहोचले असता रेनीगुंटा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांनी नायडू यांना अटक केल्यानंतर ते विमानतळाच्या फर्शीवरच निषेधासाठी बसले.

पोलिसांनी सांगितले कि, जर त्यांनी नायडू यांना जाऊ दिले, तर यामुळे निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो. तसेच निवडणूक प्रचारामुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढला असता. यासर्व गोष्टी लक्षात घेता पोलिसांनी नायडू यांना ताब्यात घेतले. अहवालानुसार, TDP नेत्याने अटक केलेल्या पोलिसांना म्हंटले कि, ते राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते आहेत आणि लोकशाही विरुद्ध उचलल्या जाणाऱ्या पावलांचा विरोध करणे त्यांचा अधिकार आहे .