संतापजनक ! दलित असल्यानं त्यांनी महिला आमदारालाच गणेश मंडपात प्रवेश नाकारला (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील अनंतवरम गावात अस्पृश्यतेबाबतची घृणास्पद घटना घडली आहे. येथे तेलगू देसम पक्षाच्या (टीडीपी) नेत्यांनी दलित समाजातील असल्याने वायएसआर कॉंग्रेसच्या आमदार वुंदावली श्रीदेवी यांना गणेश मंडपामध्ये जाऊ दिले नाही.

टीडीपी नेत्यांनी केलेला विरोध आणि गोंधळ पाहून वुंदावली श्रीदेवी भगवान गणेशाचे दर्शन घेतल्याशिवाय परत गेल्या. व्हीडीओत श्रीदेवी मंडपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असताना टीडीपी नेता संतप्त झाले आणि त्यांनी श्रीदेवी यांचा मार्ग रोखला, असे व्हिडिओत दिसत आहे. या घटनेनंतर आमदार समर्थकांमध्येही संताप पसरला आहे.

आमदार श्रीदेवी या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी चालल्या होत्या. मात्र त्यांना मंडपाबाहेरच अडवून टीडीपीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ घातल्यामुळे श्रीदेवी या दर्शन न घेताच परतल्या मात्र यावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा आक्रोश पहायला मिळाला.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like