Akola News : TDR घाेटाळा प्रकरण ! महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर एका राष्ट्रवादीच्या राज्यमंत्र्यांकडून दबाव ?

अकाेला : पोलीसनामा ऑनलाइन – अकोला येथील महानगरपालिकेतील टीडीआर घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काॅंग्रेसमधील एका राज्यमंत्र्यांकडून दबाव आणला जात आहे. तर मालमत्ता धारकांच्या बाजूने पाॅझिटिव्ह अहवाल देण्यासाठी पुणे येथील संचालक, नगररचना विभाग व मनपातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबावतंत्राचा वापर सुरु केला आहे. अशी माहिती समोर आली आहे. तर येथे बांधकाम व्यावसायिकांना तब्बल कोट्यावधी रुपये किंमतीच्या टीडीआरची विक्री केलीं आहे. टीडीआरची प्रती चाैरस मीटर नुसार जादा दराने विक्री करण्यात आली. याप्रकरणी नगर विकास विभागाच्या अवर सचिवांनी दिलेल्या निर्देशांना महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने त्या नियमांना धुडकावून दिल्याचे समाेर आले आहे.

शहरातील निवडक बांधकाम व्यावसायिकांनी मनपाचे सर्व नियमाला धुडकावून लावून वाणिज्य संकुलांचे माेठ्या धडाक्यात निर्माण केले आहे. बांधकाम नकाशा मंजूर हाेण्यापूर्वीच गाेरक्षण राेडवर वाणिज्य संकूलाच्या उभारणीसाठी गाैण खनिजाचे उत्खनन केल्याचेही प्रकार उघड झाला आहे. म्हणजेच आता काही राजकीय नेते शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हवं ते उपलब्ध करून देण्याच्या माेबदल्यात भूखंड माफीया व बड्या बिल्डरांनी नगररचना विभागावर एकप्रकारे कब्जा केला आहे. या यासंदर्भात प्रशासनाने हद्दवाढ क्षेत्रातील मौजे खडकी शेत सर्वे नं. २९/२ (भाग) मधील आरक्षण क्रमांक ११५ ( क्रीडांगण व रस्ता) ची जागा आरक्षित केली हाेती. यामुळेच टीडीआरची प्रती चाैरस मीटर नुसार जादा दराने विक्री करण्यात आली आहे.

दरम्यान, महापालिकेतील या प्रकरणावरून काही भाग धारकांनी महापालिका आयुक्त निमा अराेरा यांची भेट घेतली आहे. तर तसेच या प्रकरणावरून राष्ट्रवादी काॅंग्रेसमधील एका राज्यमंत्र्याकडून अनेकांची पाठराखण केली जात आहे. त्यामुळे राज्यमंत्र्यांच्या भूमिकेची पक्ष श्रेष्ठींकडे तक्रार केली जाणार असल्याचे पुढे आले आहे. तर राज्यमंत्र्यांनी महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांच्यावरही अशाप्रकारे दबावतंत्राचा वापर करण्यात आला होता. या दबावाला कापडणीस सामोरे गेले नाहीत.