पैसे काढण्यावर टॅक्स देण्यासंदर्भातील नियम झाला लागू, Tax डिपार्टमेंटनं जाहीर केलं यासंबंधीचं ‘कॅल्क्युलेटर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका वर्षाला १ कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख व्यवहारांवर २ टक्के टीडीएस कापला जाईल. हा निर्णय लागू झाला आहे. रोख व्यवहार कमी करण्यासाठी भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तसेच आता हा नियम अधिक सुलभ आणि लोकांना पटवून देण्याच्या उद्देशाने आयकर विभागाने आपल्या अधिकृत वेबसाइटवर एक नवीन टूल सुरू केले आहे. या टूलसह ग्राहक कलम १९४एन अंतर्गत टीडीएस कॅल्क्युलेटर करू शकतात.

यावर लागू होत नाही हा नियम
हा नियम सरकार, बँकिंग कंपनी, बँकिंगमधील सहकारी संस्था, टपाल कार्यालय, बँकिंग प्रतिनिधी आणि व्हाईट लेबल एटीएम चालवणाऱ्या घटकांवर लागू होणार नाही, कारण त्यांना व्यवसायात मोठ्या प्रमाणात रोख वापरावी लागते.

आता आले नवीन टूल
आयकर विभागाने सादर केलेला नवीन कॅल्क्युलेटर बँका, सहकारी संस्था आणि टपाल कार्यालये यांच्या अधिकृत वापरासाठी आहे.

  • सध्या ते आयकर विभागाच्या संकेतस्थळावर ‘Quick Links’ च्या खाली ‘Verification of applicability u/s 194N’ च्या नावाने दर्शवत आहे.
  • टीडीएस दराची ऍप्लिकेबिलिटी तपासण्यासाठी युजरला बँकेकडून त्याचा पॅन नंबर व मोबाईल क्रमांक भरावा लागेल.
  • हा नियम टीडीएसला आयकर रिटर्न भरण्यासाठीही जोडण्याच्या उद्देशाने आणला गेला आहे. मागील ३ वर्षांपासून तुम्ही जर आयकर भरला नसेल, तर २० लाख ते १ कोटी रुपयांची रक्कम काढण्यासाठी बँक तुमच्याकडून २% टीडीएस आकारेल.
  • जर रक्कम १ कोटींपेक्षा जास्त असेल, तर ५ टक्के पर्यंतचा टीडीएस तुमच्यावर आकारला जाऊ शकतो. गेल्या ३ वर्षात ज्यांनी आयकर भरला आहे, त्यांच्यावर १ कोटी रुपयांपर्यंतची रक्कम काढण्यासाठी कोणताही टीडीएस लागणार नाही.
पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like