एक चुस्की चाय … ! आणि बरच काही … !

पोलिसनामा ऑनलाईनखूप जुन्या काळापासून चहा पिण्याची परंपरा आहे. हे पेय  भारतासोबतच इतर देशातदेखील आवडीने घेतले जाते. भारताचा विचार करता भारतात चहा पिणाऱ्यांचे प्रमाण खूप जास्त आहे. भारतीयांच्या दिवसाची सुरुवात मुख्यतः चहानेच होते. पण चहाचे जितके फायदे आहेत तितके तोटे देखील आहेत.हल्ली ग्रीन टी पिण्याचे फॅड खूप जास्त आहे. म्हणूनच सध्या चहाच्या स्टॉलवर आता ब्लॅक टी ,ग्रीन टी देखील सहजतेने उपलब्ध होताना दिसतो आहे. ऑफिसवाले आणि आरोग्याबाबत जागरूक असणारे लोक तर हमखास ग्रीन टी पिताना दिसतात. आज जागतिक चहा दिनानिमित्ताने चहाविषयी थोडेसे.
चहातील या घटकांमुळे परिणाम 
चहा आणि कॉफीची महत्त्वाची समस्या म्हणजे या दोन्ही पेयांमध्ये साखर असते. कॅपेचिनोसारख्या कॉफीमध्ये क्रीमही असते. त्यामुळे सतत चहा- कॉफी पिणाऱ्यांच्या पोटात कॅलरीजदेखील जास्त जातात. या अतिरिक्त कॅलरीजमुळे वजन वाढण्याची शक्यता असते. हा मुद्दा लक्षात घेतला तर चहा- कॉफी दोन्हीही कमी साखरेचे किंवा साखर न घातलेले घ्यावे. शक्यतो त्यात दूधही न घातलेले चांगले. दूध न घालण्याचे कारणही समजून घेणे गरजेचे आहे. दुधात ‘केसिन’ नावाचे प्रथिन असते. हे प्रथिन चहा- कॉफीतील अँटिऑक्सिडंटस्चा प्रभाव कमी करते. पण मग कोऱ्या चहा-कॉफीने ‘अ‍ॅसिडिटी’ होणार नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो. ज्यांना चहा-कॉफीने अ‍ॅसिडिटी होते त्यांनी या पेयांमध्ये थोडेसे दूध घातले तर हरकत नाही. अन्यथा दूध किंवा क्रीम घालणे टाळावेच. त्यामुळे ‘ब्लॅक टी’ किंवा ‘ब्लॅक कॉफी’ चांगली. दूध घातल्याशिवाय चहा- कॉफी पिणे शक्यच नाही, अशी परिस्थिती असेल तर त्यात म्हशीच्या दुधापेक्षा गाईचे दूध घालणे चांगले. कारण गाईच्या दुधात स्निग्धांश कमी असतो. ‘आइस टी’ म्हणजे थंड चहा हेदेखील उत्तम पेय आहे. पण त्यातही भरपूर साखर असल्यामुळे कमी साखर घालून तो प्यायल्यास बरे.

tea-day-pic

दिवसभरात जास्तीत जास्त ३ ते ४ कप चहा किंवा कॉफी प्यायली तर चालू शकेल. त्यापेक्षा अधिक प्रमाणात आणि वारंवार ही पेये पिणे मात्र टाळावे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोपण्यापूर्वी ४ ते ६ तास चहा- कॉफी पिऊच नये. अगदी प्यायचीच असेल तर या काळात ‘डीकॅफिनेटेड कॉफी’ पिता येईल. अगदी कमी कॅफिन असलेली ही कॉफी हल्ली बाजारात मिळते. त्यात प्रतिकप १० मिलिग्रॅमइतकेच कॅफिन असते. चहा किंवा कॉफी पिऊन लगेच झोपणे मात्र चुकीचेच. काही जणांना रात्री उशिरापर्यंत किंवा अतिताणाचे काम करण्यासाठी वारंवार चहा किंवा कॉफी प्यावीशी वाटते. असे करणे बरोबर नाही हे कळून देखील ही मंडळी ते टाळू शकत नाहीत. चहा- कॉफीमधून कॅफिन पोटात गेले की तरतरी येते हे जरी खरे असले तरी त्याला एक पर्याय आहे. उशिरापर्यंत सातत्याने काम करावे लागणाऱ्यांनी दर दोन तासांनी काहीतरी खाल्ले तर शरीरातील शक्ती टिकून राहील.
चहा घ्या पण दमानच
* दिवसाला ५ ते १० कप इतक्या प्रमाणात अती उकळलेला चहा पिणारे पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध या विकारांना बळी पडतात.
* भारतीयांचे चहात साखर घालण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे बैठा व्यवसाय करणार्‍या व्यक्ती मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार आणि स्थौल्य अशा विकारांकडे ओढल्या जात आहेत.
* दूध-साखरविरहित चहा जरी पुष्कळ प्रमाणात प्यायला, तरी त्याच्या तुरट चवीच्या अतिरिक्त प्रमाणामुळे मलावष्टंभ, रक्तदाब वाने, पक्षाघातासारखे विकार आणी शुक्राणूंची संख्या अल्प होणे असे विकार बळावतात.
* दूध, साखर आणि चहाची भुकटी एकत्र करून उकळलेला चहा कफ-पित्त वाढवणारा आणि उष्ण गुणाचा आहे.
* टपरीवर चहा अ‍ॅल्यूमिनियमच्या भांड्यात उकळला जातो. अ‍ॅल्यूमिनियमच्या धातूचा खाद्यपदार्थांना झालेला दीर्घकाळ संपर्क ‘अल्झायमर्स’ (स्मृतीनाश) सारखा असाध्य विकार निर्माण करणारा असतो.
* भारतासारख्या समशीतोष्ण कटिबंधातील देशात ‘चहा’ हे कधीही, केव्हाही फार प्यायचे पेय नाही.’
* चहा चवीला तुरट असल्यामुळे तो बद्धकोष्ठता निर्माण करतो. काहींना चहा न प्यायल्यास शौचाला होत नाही हे सवयीमुळे होते. शौचाचा वेग निर्माण करणे हे चहाचे काम नव्हे. चहा रक्ताची आम्लता वाढवतो.
* नियमित चहा पिण्याने हाडे ठिसूळ होतात, रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो आणि आम्लपित्ताचा त्रास वाढतो.
* चहासमवेत आपण काही पदार्थ खातो. त्या पदार्थांमध्ये मीठ असल्यास मिठाचा चहातील दुधाशी संपर्क आल्यामुळे चहा शरीराला मारक बनतो.
खरे पाहिले तर ‘चहा’ दारू पेक्षा ही जास्त घातक आहे.
 आरोग्यदायी ग्रीन टी
ग्रीन टी  पिण्याकडे अनेकांचा कल दिसून येतो. ग्रीन टी मध्ये आले ,तुलसी ,डाळिंब ,गुलाब , गावती चहा असे अनेक फ्लेवर देखील उपलब्ध आहेत.
–ग्रीन टी मध्ये अँटिऑक्सिडंट प्रॉपर्टी असते जी अनेक आजारांपासून लढण्यासाठी मदत करते
— वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी पिला जातो
 –ग्रीन टी मुले थकवा दूर होण्यास मदत होते.
–ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते.
–चेहऱ्यावरील डाग,सुरुकुत्या कमी होतात
–दात आणि हिरड्या मजबूत होतात
–रोगप्रतिकारक शक्ती वाढते.