Tea | इतक्या कपपेक्षा जास्त प्यायलात चहा, तर पडू शकते महागात, एवढे आजार घेरतील की व्हाल त्रस्त!

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Tea | बहुतेक लोक सकाळची सुरुवात चहाने करतात. रोज सकाळी चहाचा कप घेऊन पेपर वाचायचा हा अनेकांचा दिनक्रम आहे. अनेकांना दिवसातून अनेक वेळा चहा प्यायला आवडते. दिवस असो वा रात्र, ते चहा नाकारत नाहीत. असे लोक दिवसातून किमान 5 ते 6 वेळा चहा पितात. पण तुम्हाला माहित आहे का की एका दिवसात इतका चहा पिणे किती हानिकारक आहे. त्यामुळे शेवटी प्रश्न पडतो की, दिवसभरात नक्की किती कप चहा प्यावा. याविषयी जाणून घेऊया. (Tea)

 

जास्त चहा पिण्याचे तोटे
दिवसभरात जास्त चहा पित असाल त्याचे अनेक तोटे आहेत. दिवसातून 5 ते 6 कप चहा प्यायल्याने शरीरात डिहायड्रेशन (Dehydration) होऊ शकते. याशिवाय जास्त चहा प्यायल्याने हाडे कमकुवत होतात. चहामध्ये कॅफिन आढळते, ज्यामुळे चिंता आणि तणाव निर्माण होतो. तसेच चहा प्यायल्याने शरीरात लोहाची कमतरता होऊ शकते. (Tea)

रिपोर्ट काय म्हणतो
युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड मेडिकल सेंटरच्या अहवालानुसार, दिवसातून चार कप चहा प्यायल्याने अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते. चहातील कॅफिनमुळे छातीत जळजळ, नर्व्हसनेस, निद्रानाश आणि चक्कर येणे यासारख्या अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.

 

संपूर्ण दिवसात किती कप चहा प्यावा
दिवसभर फक्त एक ते दोन कप चहा प्या.
यापेक्षा जास्त चहापत्ती आणि साखरेचा चहा प्यायल्याने शरीराचे अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते.
पण जर तुमची प्रकृती ठीक नसेल आणि तुम्हाला सर्दीचा त्रास होत असेल
तर तुम्ही दिवसातून दोन ते तीन कप काढा किंवा हर्बल टी पिऊ शकता.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Tea | how many cups of tea should we drink in a day side effects of tea

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Workout | महिलांनो, असे करत असाल वर्कआऊट तर व्हा सावध; अन्यथा होऊ शकते दुप्पट नुकसान, जाणून घ्या कधी स्कीप करावी एक्सरसाईज

Pune Crime | चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या 48 वर्षाच्या नराधमाला अटक

CM Eknath Shinde On Shivsena | ‘शिवसेना कुणा कुटुंबाची प्रायव्हेट कंपनी नाही’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे