Coronavirus : ‘कप’भर चहा ‘कोरोना’वर रामबाण उपाय आहे ? जाणून घ्या ‘वास्तव’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – भारतीय संशोधकांना कोरोनावर चहा हे रामबाण उपाय असल्याचे स्पष्ट केले आहे. ब्लॅक टी हा प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग्य पर्याय आहे. कारण चहा हे अँटी व्हायरल गुणधर्म असलेले सर्वात नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट पेय आहे. रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी चहा पिणे आवश्यक आहे, असा दावा डॉक्टर प्रीतम चौधरी यांनी केला आहे.


कोरोना व्हायरसमुळे जगभरात धुमाकूळ घातला असून आतापर्यंत 11 हजारहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. भारतातही कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत 320 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अद्यापही कोरोनावर ठोस उपाय सापडलेला नाही आहे. अमेरिकेत कोरोना लसीची चाचणी होत आहे, तर फ्रान्सने लस शोधल्याचा दावा केला आहे.

कोरा चहा किंवा ब्लॅक टीचे सेवन केल्यामुळे रोग प्रतिकारशक्ती तर वाढतेच त्याचबरोबर थेफ्लॉव्हिन आणि पॉलीफेनॉल हेपेटायटीस विषाणूचा प्रवेश रोखला जातो. त्यामुळे आसाममधून येणार्‍या ब्लॅक टीकडे कोरोना व्हायरसवरचा रामबाण उपाय म्हणून पाहिले जात आहे. जोरहाट आसाममधील चहा असोसिएशनच्या संशोधनात असे म्हटले आहे की, ब्लॅक टी हा संभाव्य उपाय असू शकतो. असे असले तरी चहा हे सर्वच रुग्णांवर उपायकारक ठरेल असे नाही. जर तुम्हाला कोरोनाची लक्षण वाटत असतील तर रोज एक कप चहा तुमची प्रतिकारशक्ती वाढवेल. त्यामुळं कोरोना रोखण्यासाठी ब्लॅक टीकडे एक उपाय म्हणून पाहिले जाऊ शकते.