Tea Side Effects | High Blood Pressure च्या रूग्णांसाठी नुकसानकारक आहे या मसाल्याचा चहा, Avoid करणे चांगले

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Tea Side Effects | भारतात चहा पिणार्‍यांची कमतरता नाही, चहा हे पाण्यानंतर सर्वाधिक प्यायले जाणारे पेय आहे. लोकांना त्यात वेगवेगळ्या प्रकारचे मसाले मिसळायला आवडतात. विशेषतः आल्याचा चहा पिणार्‍यांची संख्या मोठी आहे. आले हे औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे, त्यामुळे ते आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. हा मसाला सर्दी, खोकला यावर खूप गुणकारी आहे, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो, तसेच लोक पचन सुधारण्यासाठी याचे सेवन करतात, परंतु हा मसाला हानिकारक देखील ठरू शकतो. (Tea Side Effects)

 

हायबीपीच्या रुग्णांनी आल्याचा चहा पिऊ नये
जीआयएमएस हॉस्पिटल, ग्रेटर नोएडा येथे कार्यरत सुप्रसिद्ध आहारतज्ञ डॉ. आयुषी यादव यांनी सांगितले की, जसे प्रत्येक गोष्टीत फायदे आणि तोटे दोन्ही लपलेले असतात, तसेच आल्याचेही आहे. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी आल्याचा चहा पिऊ नये कारण तो त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकतो. यासोबतच चक्कर येणे, अशक्तपणा यासारख्या समस्या होऊ शकतात.

आल्याच्या चहाचे इतर तोटे

1. अस्वस्थता
जर तुम्हाला वारंवार अस्वस्थ वाटत असेल तर आल्याचा चहा पिणे बंद करा, कारण यामुळे पचनक्रिया वेगवान होते, त्यामुळे अस्वस्थता वाढू शकते.

 

2. पोटात जळजळ
जरी आले हे पचनासाठी चांगले असले, तरी ते जास्त प्रमाणात सेवन केले तर ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते कारण यात जिंजरॉल आढळते जे पोटात जास्त प्रमाणात अ‍ॅसिड सोडते, ज्यामुळे पोटाच्या तक्रारी होऊ शकतात. जळजळ होत असेल तर आले मर्यादित प्रमाणातच खावे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Tea Side Effects | high bp blood pressure ginger tea side effects uneasiness stomach irritation Tea Side Effects adark

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Anil Bonde | …म्हणून राहुल गांधी आणि रावणामध्ये जास्त साम्य आहे, खा. अनिल बोंडे यांचं टीकास्त्र

Builder Paras Porwal Suicide | मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांची 23 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

Ajit Pawar | ‘या’ कारणामुळे सर्व कार्यक्रम रद्द करून अजित पवार गेले थेट बारामतीला