पक्ष बदलणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा : नितीन गडकरी

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तिकीट मिळवण्यासाठी अनेक नेत्यांकडून पक्षांतर चालू आहे. पक्ष बदलणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा असं आवाहन भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे . त्यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये पक्षांतर केलेल्या बाळू धानोरकरांना उद्देशून हे विधान केलं आहे. चंद्रपूर येथे भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री हंसराज यांच्या प्रचार सभेत गडकरी बोलत होते.

बाळू धानोरकरांवर टीका करताना नितीन गडकरी म्हणाले की, ‘आजकाल तर मला कळतच नाही निवडणूका आल्या की कोण कोणत्या पक्षात घुसतय काही पत्ताच लागत नाही. पक्षांतर करणाऱ्यांसाठी काळीपिवळी टॅक्सी लागली आहे. या भाड्याच्या टॅक्सित बसा आणि मीटर डाउन करा. यांचा कोणत्याच विचारांशी काहीच संबंध नाही. ‘आता जय महाराष्ट्रवाले काँग्रेसमध्ये गेले आहेत. असा टोला त्यांनी बाळू धानोरकरांना लगावला आहे.

जब जी चाहे तो नयी दुनिया बसा लेते है लोग, एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते है लोग-
धानोरकरांच्या पक्षांतराविषयी बोलताना गडकरी म्हणाले की -‘जब जी चाहे तो नयी दुनिया बसा लेते है लोग ,एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते है लोग ।’ कालपर्यंत जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र म्हणणारे बाळासाहेब आज दुसऱ्या पक्षात आहेत. तुम्ही नक्की कशाला निवडून देणार- दलबदल करणाऱ्या उमेदवाराला ? असा प्रश्न विचारत त्यांनी नेत्यांना पक्ष बदलणाऱ्यांना नेत्यांना निवडणुकीत धडा शिकवा असे आवाहन मतदारांना केले आहे.

नितीन गडकरी यांनी भाजपविरोधी पक्षांतरावर टीका केली आहे. मात्र भाजपमध्ये आलेल्या नेत्यांविषयी एक शद्बही काढला नाही त्यामुळे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये इनकमिंग सुरु आहे त्याच काय हा प्रश्न मात्र कायम आहे.

शेवटच्या क्षणी उमेदवार बदलून धानोरकरांना तिकीट-
काँग्रेसने घोषित केलेला उमेदवार शेवटच्या क्षणी बदलून त्यांच्याऐवजी शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांना उमेदवारी दिली आणि लढतीचे चित्रच बदलून गेले. धानोरकरांच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी केली. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून कॉंग्रेसमध्ये चांगलच रणकंदन झाले होते. दोन उमेदवाराला डावलून र बाळू धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली. धानोरकरांच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी केली. तर भाजपकडून चंद्रपूर मतदारसंघातून केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना उमेदवारी दिली आहे.