संविधानात बदल करणाऱ्या भाजपा सरकारला निवडणुकीत धडा शिकवा : प्रफुल्ल पटेल

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात एकता, समानता आणि न्याय देण्यासाठी पवित्र संविधान लिहिले. मात्र भाजपा सरकार संविधानात बदल करण्याचा प्रयत्न करीत नागरिकांच्या हक्क आणि मुलभूत अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न करीत आहे. संविधानात बदल करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना या निवडणुकीत धडा शिकवून त्यांची जागा दाखवून द्या असे वक्तव्य खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले. भंडारा येथील आयोजित प्रचार सभेत त्यांनी म्हंटले.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या प्रचारार्थ गोंदिया तालुक्यातील खमारी, फुलचूर, नागरा, मरारटोली, कुडवा येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थितांना संबोधतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात एकता, समानता आणि न्याय देण्यासाठी पवित्र संविधान लिहिले. याच संविधानामुळे नारिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य व मुलभूत अधिकार मिळाले आहे. मात्र भाजपा सरकार संविधानात बदल करण्याचा प्रयत्न करीत नागरिकांच्या हक्क आणि मुलभूत अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न करीत आहे. असे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, मागील ७० वर्षांपासून देशाची लोकशाही ज्या संविधानाच्या आधारावर सुरू आहे. त्यामुळे देशात एकता, समानता, बंधूता टिकून त्याच संविधानाला बदलण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. तर दुसरीकडे भाजपचे प्रवक्ता शेतकऱ्यांच्या मुलांना लावारिस म्हणत आहे. ज्यांनी मागील पाच वर्षात केवळ आश्वासनाशिवाय काहीच दिले नाही, त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची हिच वेळ असेही त्यांनी म्हंटले.

याचबरोबर, प्रफुल्ल पटेल म्हणाले, जेव्हा राजधानी दिल्लीत संविधानाच्या प्रतिकात्मक प्रती जाळून संविधानाचा अवमान केला जात होता. तेव्हा स्वत:ला देशाचा चौकीदार समजणारे कुठे होते असा सवालही त्यांनी केला.