ताज्या बातम्या

ITI मध्ये महिला पर्यवेक्षिका आणि शिक्षकामध्ये जुंपली, एकमेकांवर चाकू हल्ला

भुसावळ : पोलीसनामा ऑनलाईन – शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील महिला पर्यवेक्षिका आणि शिक्षकामध्ये झालेल्या वादातून त्यांनी एकमेकांवर चाकूने वार केल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी बोदवड जवळील नाडगाव येथे घडला. यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. तर दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे.

शिक्षक कपूरचंद एकनाथ पाटील आणि महिला पर्यवेक्षिका चंदा घरकर हे दोघे जखमी झाले आहेत.

बुधवारी सकाळी चंदा घरकर या त्यां.च्या कार्यालयाच्या केबीनमध्ये आपले काम करत होत्या. त्यावेळी शिक्षक एकनाथ पाटील हे दुसऱ्या बाजूने तेथे आले. त्यानंतर त्यांच्यात बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे पर्यवसन हाणामारीत झाले. त्यानंतर पाटील आणि घरकर यांनी एकमेकांवर चाकू हल्ला करत एकमेकांना गंभीर जखमी केले.

हल्ला का करण्यात आला याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. तर बोदवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून दोघांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.

सिने जगत –

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

अभिनेत्री करिना कपूरला अभिनेता रणवीर सिंह बरोबर ‘हे’ करायचंय !

ये ‘परश्या’ तुझी ‘आर्ची’ लगीन करतीया लगीन !

 

 

 

Back to top button