शिक्षकाकडून सहा ते सात मुलींवर लैंगिक अत्याचार, मुख्याध्यापकांवरही गुन्हा दाखल

पिंपरी: पोलीसनामा आॅनलाईन

पिंपरी चिंचवड शहरात लैंगिक अत्याचाराच्या घटना या दिवसेंदिवस वाढत आहेत. आता जो प्रकार समोर आला आहे तो वाचून नक्कीच आश्चर्य वाटेल. मुलीत शाळेतसुद्धा सुरक्षित आहेत की नाहीत असा प्रश्न पडेल. चक्क गुरुनेच शिष्येवर अत्याचार केल्याचे समोर येत आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत लैंगिक अत्याचाराच्या घटनांचे सत्र सुरुच आहे. एका शिक्षकाने एक नव्हे दोन नव्हे तर चक्क सहा ते सात मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पीडित मुलींनी याची तक्रार करूनही मुख्याध्यापकांकडून हे प्रकरण दाबण्यात आले होते.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9e4b7010-c89b-11e8-809d-bf169eb31ba9′]

पोलीसांच्या माहितीनुसार, चक्क दोन वर्षांपासून हा थक्क करणारा प्रकार सुरु होता. बालाजी डोंबे असं या शिक्षकाचं नाव अाहे. हे प्रकरण चक्क मुख्याध्यापकांकडूनच दाबण्यात आलं होतं. संबंधित शिक्षक, मुख्याध्यापक तसेच इतर दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल झाला आहे. सदर घटना माहीत असूनही त्याची तक्रार न केल्यामुळे मुख्याध्यापक व इतर दोन शिक्षकांना आरोपी करण्यात आलं आहे. तसेच या चार शिक्षकांचं निलंबनही करण्यात आलं आहे.

१ आॅक्टोबर रोजी काही मुलींनी एकत्र येऊन सदर घटनेबबात तक्रार मुख्याध्यापकांकडे तक्रार केली होती परंतु त्यांच्याकडून यावर पडदा टाकण्यात आला. शेवटी हे प्रकरण वरिष्ठांकडे गेलं आणि अखेर या शिक्षकांचं बिंग फुटलं. डोंबे हा विद्यार्थिंनींना शाळेतील एका खोलीत किंवा घरी बोलावून असे चाळे करत होता. अक्षरश: अश्लील चित्रफित दाखवण्यापर्यंत या शिक्षकाची मजल गेली होती. वरिष्ठ पातळीवर चौकशी केल्यानंतर आरोपी शिक्षकाच्या छातीत दुखू लागलं. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पिंपरी चिंचवडमध्ये खरंच महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्न समोर येत आहे.

[amazon_link asins=’B0748NPV86,B016115VXW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’49534fb8-c89c-11e8-91a7-d782f30edf02′]