माॅडेल झाली मिस टीचर : अल्पवयीन विद्यार्थ्याला न्यूड फोटो पाठवल्याने  शिक्षिका गजाआड

वृत्तसंस्था – एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थी मुलीवर लैंगिक अत्याचार केलेल्या अनेक घटना आपण वाचल्या किंवा ऐकल्या असतील. पंरतु एका शिक्षिकेने आपल्या अल्पवयीन विद्यार्थी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना तुम्ही कधी वाचली आहे का? आता तुम्ही जी घटना आपण वाचणार आहोत ती वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल आणि धक्काही बसेल. कारण एका माॅडेल असणाऱ्या एका शिक्षिकेने आपल्या अल्पवयीन विद्यार्थ्याला न्यूड फोटो पाठवल्याने लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली पोलीसांनी अटक केले आहे.

सदर घटना ही अमेरिकेतील आहे. मॉडेल रॅमसे बिअर्स असं या माॅडेलचं नाव आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु ही शिक्षिका अमेरिकेतील ब्यूटी कॉन्टेस्ट जिंकणारी एक माॅडेल आहे. तिचे वय 28 वर्षे आहे. दरम्यान तिने 15 वर्षीय मुलाला न्यूड फोटो पाठवल्याचा आरोप आहे. अल्पवयीन तरुणाला आपले अश्लिल फोटो पाठवल्या प्रकरणी बिअर्सला पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. पीडित मुलाच्या पालकांना हे फोटो  मुलाच्या मोबाइलमध्ये आढळून आले आणि त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आल्याचे समजत आहे. बियर्सने 2014 मध्ये मिस केंटकी हा खिताब जिंकला होता. विशेष म्हणजे मॉडेल शिक्षकदेखील आहे.

पीडित मुलाला शाळेत सहावी ते आठवीपर्यंत बियर्स शिक्षिका होती अशी माहिती मुलाच्या आईने दिली आहे. तर दुसरीकडे मुलाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा मॉडेलकडे शिकवणीसाठी जात असे. पण नुकतंच त्याच्या मोबाइलमध्ये आम्हाला अश्लील फोटो आढळले. मुलाच्या आई-वडिलांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेत याप्रकरणी तक्रार केली. महत्त्वाचे म्हणजे मॉडेल बियर्सनेही आपण स्नॅपचॅटवरुन मुलाला फोटो पाठवल्याचं मान्य केलं आहे अशी माहितीही समोर आली आहे.

बियर्सला होऊ शकते 20 वर्षे शिक्षा 
मुख्य म्हणजे या प्रकरणात अजून कोणी अडकलं होतं का याची माहिती पोलीस घेत आहेत. बियर्स ज्या शाळेत शिक्षिका होती त्या शाळेनेदेखील यासंबंधी स्टेटमेंट जारी केल्याचं समजत आहे. ‘बियर्स आमच्या शाळेत शिक्षिका होती. आम्ही तिच्या खासगी आयुष्यावर टिप्पणी करु शकत नाही. मात्र आम्ही जी काही प्रक्रिया असेल तिचा अवलंब करु’ असं शाळेने म्हटल्याचं समोरल आलं आहे. महत्त्वाचे म्हणजे जर बियर्स दोषी ठरली तर तिला 20 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.