धक्कादायक ! मुख्याध्यापक पदासाठी दोन शिक्षणाधिकाऱ्यांसमोर शिक्षकांची चपलेने हाणामारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्हा परिषदेच्या श्री. ह. ब. गिरमे महाविद्यालयातील मुख्याध्यापक पदाच्या सेवाज्येष्ठतेच्या सुनावणीकरता शिक्षणाधिकाऱ्यांसमोर आल्यानंतर दोन शिक्षकांमध्ये चक्क चपलेने हाणामारी झाल्याचा प्रकार सोमवारी (दि. २७) रोजी जुन्या जिल्हा परिषदेमध्ये घडला. याप्रकरणी चपलेने मारहाण करणाऱ्या शिक्षकाविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मधुकर दामोदर बहुले ( वय ५०, घोरपडे पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संभाजी शिरसाट व शिक्षक गिते यांच्याविरोधात अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्हा परिषदेच्या ह. ब. गिरमे महाविद्यालयातील मुख्यापक पदाच्या सेवा ज्येष्ठतेच्या निर्णयासंदर्भात सोमवारी शिक्षणाधिकाऱ्यांसमोर सुनावणी होती. यावेळी बहुले आणि गिते यांच्यासह शिरसाटही शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात आले होते. त्यावेळी संभाजी शिरसाट आणि शिक्षक गिते यांनी सायंकाळी साडेचारच्या सुमारास जुनी जिल्हापरिषद येथे आल्यावर बहुले यांना शिरसाट व गिते यांनी जातिवाचक बोलत त्यांना तू हेड मास्तर पदाचा माज करू नको. असे बोलत खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांना चप्पलने मारहाण करत कार्यालयाबाहेर ढकलून देण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना तुझा कायमचा काटा काढतो असे म्हणून धमकी दिली. असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त प्रदिप आफळे करत आहेत.

Loading...
You might also like