‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’चं सर्वेक्षण करताना शिक्षकाचा ‘कोरोना’मुळं मृत्यू झाल्याचा दावा, कुटुंबियांना 50 लाखाचा विमा मिळवून देण्याची मागणी

शिरूर – शिरूर तालुक्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या शिक्षकाचे कोरोनामुळे निधन झालेले असल्याने सदर शिक्षकाच्या कुटुंबियांना ५० लाखाचा विमा मिळवून देण्यात यावा यासह आदी मागण्या शिरूर तालुका शिक्षक संघाच्या वतीने शासनाकडे करण्यात आल्या आहे.

शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथील अभिनव विद्यालयातील भरत नामदेव सरोदे या ५१ वर्षीय शिक्षकाचे १६ व १७ सप्टेंबर रोजी शिरूर नगरपालिका हद्दीत कोविड सर्वेक्षणाचे कर्तव्य बजावत असताना कोरणाचा संसर्ग होऊन मृत्यू झाला.मुळात सदर शिक्षकाला हृदयविकाराचा त्रास असताना त्यांना सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली होती.मात्र त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांना ५० लाखाचा विमा शासनाच्या माध्यमातून मिळवून द्यावा अशी मागणी शिक्षक संघाच्यावतीने तहसीलदार लैला शेख, गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे,शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी शिरूर-हवेली माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे,कार्याध्यक्ष प्रवीणकुमार जगताप,सचिव नितीन माने,शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष तुकाराम बेनके,सचिव रामदास थिटे, मुख्याध्यापक संघाचे जिल्हा प्रतिनिधी मारुती कदम,दिलीप पवार यांसह आदी उपस्थित होते. तर यावेळी शासनाला देण्यात आलेल्या निवेदनात शिक्षकांना देण्यात येणारे आदेश हे व्हाट्सअॅपवर न देता लेखी स्वरूपात देण्यात यावे,सर्वेक्षणाचे काम केलेल्या शिक्षकांना पुन्हा सर्वेक्षणाचे आदेश देऊ नयेत,पन्नास वर्षा पुढील तसेच आजाराने त्रस्त असणाऱ्या तसेच कुटुंबात कोरोना बाधित रुग्ण असणाऱ्या शिक्षकांना सर्वेक्षणाचे काम देऊ नयेत,कामाचे स्वरूप दहा दिवसाचे व बदलून असावे,कामा दरम्यान शिक्षकांना सन्मानाची वागणूक मिळावी,सर्वेक्षण करण्याचे काम करणाऱ्या शिक्षकांना पन्नास लाखाचे विमा कवच पुरविण्यात यावे यांसह आदी मागण्या यावेळी शिक्षकांनी दिलेल्या निवेदनात शासनाकडे करण्यात आल्या आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like