तीन दिवसांपूर्वी शिक्षिका म्हणून झाली रुजु ; अन् काळाने आज केला ‘असा’ घात

पुणे/चिखली : पोलीसनामा ऑनलाइन – तीनच दिवसांपूर्वी शिक्षिका म्हणून रुजु झालेल्या महिलेचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला. तर तिच्या सोबत असलेली सहकारी शिक्षिका गंभीर जखमी झाली आहे. ही घटना कुदळवाडी येथील रिव्हर रेसिडेन्सी परिसरात आज (शनिवार) सकाळी घडली. वेदा दपीक मुळे (वय-28 रा. डुडुळगाव) असे मृत्यू झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे. तर जयश्री चौगुले (वय- 29) या गंभीर जखमी झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून रस्ता ओलांडत असताना भरधाव मोटारीची धडक दोघींना बसली. यामध्ये वेदा मुळे यांचा गांभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मोटारचालक रविकांत कृष्णप्रसाद राजू (रा. रिव्हर सेसिडेन्सी) याच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे.

मुळे आणि चौगुले या रिव्हर रेसिडेन्सी परिसरातील एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. वेदा या तीनच दिवसांपूर्वी येथे रुजु झाल्या होत्या. शाळेत जात असताना भरधाव मोटारीची त्यांना जोरदार धडक बसली. यात वेदा या गाडीवरून पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर जयश्री यांच्या हाताचे व पायाचे हाड मोडले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत दीपा यांना दोन आणि चार वर्षांची मुले आहेत. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/