पार्टनरला ‘अश्लील’ मेसेज पाठवत होती शिक्षिका, मात्र पोहचला विद्यार्थ्यांना अन् झालं ‘असं’ काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंडच्या वेस्ट नॉटिंघमशायरच्या कॉलेजमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका शिक्षिकेला तिच्या कृत्याची मोठी किंमत चुकवावी लागली असून तिला नोकरी देखील सोडावी लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हि शिक्षिका आपल्या जोडीदाराला अश्लील मॅसेज पाठवत होती. मात्र ते क्लासमध्ये लागलेल्या डिजिटल स्मार्टबोर्डवर झळकले. मात्र विद्यार्थ्यांनी याचे फोटो काढत ते सोशल मीडियावर व्हायरल केले. हे प्रकरण समोर आल्यानंतर या शिक्षिकेला तात्काळ कामावरून कमी करण्यात आले. त्याचबरोबर कॉलेज प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरु केली असून यामध्ये आरोप असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना लेखी माफी मागण्यास सांगण्यात आली आहे. कॉलेजच्या प्राचार्यांनी या घटनेची पुष्टी केली असून पुढील तपास सुरु असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या चुकीची त्यांच्या पालकांना माफी मागण्यास सांगण्यात आली असून या शिक्षिकेने देखील आपल्या कृत्याची माफी मागितली आहे. तसेच तपासामध्ये पुढील सर्व स्पष्ट होईल असे देखील प्राचार्यांनी सांगितले.

Visit : Policenama.com